AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

News9 Global Summit : ‘त्यावेळी सगळे प्रेक्षक शांत झाले’, हीरामंडी फेम ताहा शाहने सांगितला ‘पारो’चा तो किस्सा

News9 Global Summit : "आज मी माझे रोल्स निवडू शकतो ही मुभा माझ्याकडे आहे. कारण आमच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जो पर्यंत ठराविक स्थान गाठत नाही, तो पर्यंत तुमच्याकडे मुभा नसते" असं ताहा म्हणाला. "आम्ही चित्रपटांना नाही, तर चित्रपट आम्हाला निवडतात" असं ताहा शाहने सांगितलं.

News9 Global Summit : 'त्यावेळी सगळे प्रेक्षक शांत झाले', हीरामंडी फेम ताहा शाहने सांगितला 'पारो'चा तो किस्सा
taha shah
| Updated on: Jun 20, 2025 | 10:14 AM
Share

भारतातीव सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 च्या आंतरराष्ट्रीय न्यूज 9 ग्लोबल समिटला सुरुवात झाली आहे. ही समिट दुबईमध्ये सुरु आहे. या खास क्षणांच साक्षीदार होण्यासाठी अनेक प्रसिद्ध व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलय. यात अभिनेता विवेक ओबरॉय, सुनील शेट्टी, कॉमेडियन आणि अभिनेता सायरस ब्रोचा, शालिनी पासी आणि एकता कपूर सारखे स्टार्स आहेत. या खास इवेंटमध्ये हीरामंडी फेम अभिनेता ताहा शाह सुद्धा सहभागी झालेला. हीरामंडी फेम शहजादे म्हणजे ताहा शाहने स्टेजवर येताच लोकांच्या मनाला स्पर्श केला. ताहाने सोशल मीडियावर चांगली लोकप्रियता मिळवली आहे. ताहाला इंटरनेटवर शहजादेच्या नावाने ओळखलं जातं. ताहा आणि शारमिनची केमेस्ट्री लोकांना खूप आवडली. न्यूज 9 ग्लोबल समिटच्या मंचावर ताहा आपलं करिअर आणि रोल्सबद्दल बोलला. कधीही न विसरता येणारे स्ट्रगलचे दिवस

ताहा शाहसोबत न्यूज 9 ग्लोबल समिटच्या मंचावर अभिनेत्री रिद्धी डोगरा, छावा फेम एक्टर विनीत सिंह आणि डॉक्टर सना साजनही उपस्थित होते. हे सर्व लोक Streaming stars, Screaming Success सेगमेंटचा भाग होते. या सेगमेंटमध्ये सर्वांनी सक्सेस आणि कधीही न विसरता येणाऱ्या स्ट्रगलच्या दिवसांबद्दल बोलले. टाइपकास्ट रोल आणि त्याला शहजादे बोललं जात या प्रश्नावर ताहाने आपलं मत मांडलं.

मी माझ्या रोल्सबद्दल खूप पर्टिक्युलर

ताहा म्हणाला की, “मी ओटीटीचा शहजादा आहे की नाही, हे मला माहित नाही. टाइपकास्ट होणं हे तुमच्या हातात नाहीय. कुठल्याही फळाच्या अपेक्षेशिवाय तुम्ही तुमचं काम किती मेहनतीने करता हे तुमच्या हातात आहे. जर, तुम्ही तुमची हिम्मत आणि समज यांच्या हिशोबाने योग्य पाऊल उचललं तर कोणी ना कोणी असा बसलाय जो तुमच्यासाठी प्लान करतोय. मी माझ्या रोल्सबद्दल खूप पर्टिक्युलर आहे”

चित्रपट आम्हाला निवडतात

“आज मी माझे रोल्स निवडू शकतो ही मुभा माझ्याकडे आहे. कारण आमच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जो पर्यंत ठराविक स्थान गाठत नाही, तो पर्यंत तुमच्याकडे मुभा नसते” असं ताहा म्हणाला. “आम्ही चित्रपटांना नाही, तर चित्रपट आम्हाला निवडतात. मी हीरा मंडीनंतर पारो नावाच्या चित्रपटात काम केलं. हा चित्रपट ब्रायडल स्लेवरीवर आधारीत होता. हा चित्रपट अलीकडेच कान्स आणि ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीमध्ये दाखवण्यात आला” असं ताहा म्हणाला.

त्यावेळी लोक सायलेंट होते

पारोनंतर सर्वात चांगली कॉम्पलीमेंट काय मिळाली? त्यावर ताहा म्हणाला की, “जेव्हा कुठल्या फिल्मचा प्रिमियर संपतो, तेव्हा तिथे उपस्थित असलेले सगळे लोक टाळ्या वाजवतात. पण पारोच्या स्क्रीनिंगवेळी सगळे प्रेक्षक शांत होते. कारण चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना इतकं वाईट वाटलं की, ते सायलेंट होते” ‘जेव्हा जनतेला अशी भावनात्मकता जाणवते, ती एक मोठी अचिवमेंट असते’ असं ताहाने सांगितलं.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.