
बॉलिवूडची बेबो म्हणजे करीना कपूर ही तिच्या फॅशन आणि जीवनशैलीमुळे कायमच चर्चेत असते. तसेच ती आई म्हणूनही तिच्या मुलांबाबतच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर,मुलाखतींमध्येही सांगताना दिसते. कारण करीना अभिनेत्री म्हणून सर्वांना आवडतेच पण ती एक पालक म्हणून कशी आहे हे देखील जाणून घेण्यात सर्व चाहत्यांना उत्सुकता असते. तसेच करीना आणि सैफच्या कुटुंबातील जवळपास सर्वजणच अभिनय क्षेत्राशी संबंधीत आहे. मग करीना आणि सैफच्या दोन्ही मुले देखील इतर स्टारकिड्सप्रमाणे बॉलिवूडमध्ये आपलं भविष्य घडवणार का?असा प्रश्न तिला अनेकदा मुलाखतींमध्ये विचारला जातो. पण या संदर्भात करीना कपूर खानने तिचा मुलगा तैमूर अली खानबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
तैमूरला जायचं या क्षेत्रात…
करीना कपूर खान अलीकडेच तिची सोहा अली खानच्या नवीन पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा तिने तिच्याबद्दस सैफबद्दल तसेच तिच्या दोन्ही मुलांबद्दल बऱ्याच गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यात तिने एक गोष्ट सांगितली की ती म्हणजे तैमुरच्या करिअरच्या पसंतीबद्दल.
त्याला अभिनय आवडत नाही कारण….
पॉडकास्ट दरम्यान करीनाने खुलासा केला की तिचा मुलगा तैमूर अली खानला अभिनय किंवा नाटकात रस नाही. “जेव्हा जेव्हा त्याला शाळेत एखादा अभ्यासक्रमाव्यतिरिक्तचा प्रोजेक्ट निवडायचा असतो तेव्हा मी त्याला नाटकाच्या वर्गाबद्दल सांगते,” ती म्हणाली. “पण त्याचे उत्तर असते, ‘नाही, आई, मला ते आवडत नाही.’ मी त्याच्यावर कधीही दबाव आणला नाही कारण त्याला अभिनयात रस नाही.
तैमूरला काय आवडते ते करीनाने सांगितले.
करीनाने पुढे स्पष्ट केले की तैमूरला अभिनयापेक्षा स्वयंपाक आणि क्रिकेटमध्ये जास्त रस आहे. त्याने एकदा सांगितले होते की त्याला स्वयंपाक क्लासला जायचे आहे कारण त्याचे वडील सैफ अली खानला देखील स्वयंपाकाची आवड आहे. तो अभिनेत्यांपेक्षा क्रिकेटपटूंबद्दल जास्त उत्साही असतो. तो मला विचारतो, ‘तू रोहित शर्माला ओळखतोस का? तुला विराट कोहलीकडून बॅट मिळेल का? तुझ्याकडे मेस्सीचा नंबर आहे का?’ आणि माझा कोणताही संपर्क नाही,” असं म्हणत तिने लेकाची ती आवड सांगितली.
त्याची आवड ही त्याच्या आजोबांशी मिळतीजुळती
तैमूर अली खानचे कुटुंब, त्याच्या आजीपासून ते त्याच्या वडिलांपर्यंत, सर्वच प्रसिद्ध चित्रपट व्यक्तिमत्त्वे आहेत. त्याचे आजोबा, मन्सूर अली खान पतौडी हे एक प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. यामुळे असा अंदाज लावला जात आहे की त्याला क्रिकेटची आवड त्याच्या आजोबांकडून आली आहे. त्यामुळे आता मोठं झाल्यानंतर तैमुरची आवड स्वयंपाक आणि क्रिकेटच राहणार की बदलणार हे काही वर्षांनी पाहायला मिळेलच.