AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tanushree Dutta : नाना पाटेकरांबद्दल तनुश्री दत्ताचं वादग्रस्त विधान; नेटकऱ्यांचा संताप; म्हणाले, तिला लाज…

Tanushree Dutta : नाना पाटेकर यांच्या निधनावर तनुश्री दत्तानं वादग्रस्त विधान केलेलं. अभिनेत्रींच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Tanushree Dutta : नाना पाटेकरांबद्दल तनुश्री दत्ताचं वादग्रस्त विधान; नेटकऱ्यांचा संताप; म्हणाले, तिला लाज...
| Updated on: Oct 08, 2026 | 7:05 PM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गुरुवारी वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालं. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत. तसेच तनुश्रीनं विमानतळावरून एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितलं की ती प्रवासात आहे आणि या घटनेबद्दल बातम्यांमधून समजलं. तनुश्रीनं कोणाचंही नाव घेतलं नाही, परंतु कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला, मात्र, ज्या व्यक्तीचं निधन झालं, त्यांचं वर्णन करताना अभिनेत्रीनं ‘इव्हिल डेड’ (evil dead) हा शब्दप्रयोग केला.

तनुश्री दत्ताच्या विधानावर नेटकऱ्यांची टीका

अभिनेत्रीनं कोणाचंही नाव घेतलं नाही, तरीही सोशल मीडियावर लोक असं म्हणत आहेत की, तिनं नाना पाटेकर यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. तनुश्रीचं विधान आणि विशेषतः ‘इव्हिल डेड’ हा शब्दप्रयोग नेटकऱ्यांना अजिबात आवडलेला नाही आणि त्यांनी अभिनेत्रीवर टीका केली आहे.

एका नेटकऱ्याने ट्विट करत लिहिलं की, ‘तनुश्री दत्ताला लाज वाटली पाहिजे. नुकतीच देवाज्ञा झालेल्या एका ज्येष्ठ अभिनेत्याबद्दल अशा प्रकारची अपमानास्पद भाषा वापरणं अत्यंत संतापजनक आहे.’ आणखी एका युजरने लिहिलं की, ‘हे अत्यंत संतापजनक आहे!’

तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वाद

अनेक वर्षांपूर्वी, अभिनेत्री तनुश्री दत्तानं ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांच्यावर छळाचा आरोप केला होता. अभिनेत्रीनं सांगितलं की, नाना पाटेकर यांनी अयोग्य वर्तन केलं. नंतर, २०१८ मध्ये एका मुलाखतीदरम्यान, #MeToo चळवळीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्रीनं त्या घटनेबद्दल पुन्हा भाष्य केलं.

दरम्यान, डॉक्टरांनी एएनआयला सांगितलं की, नाना पाटेकर यांना रुग्णालयात मृत अवस्थेत आणण्यात आलं होतं आणि त्यांना ४५ मिनिटे ते एक तास त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला, परंतु ते नाना पाटेकर यांना वाचवू शकले नाहीत.

नाना पाटेकर यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘अंकुश’, ‘प्रतिघात’, ‘सलाम बॉम्बे!’ आणि ‘परिंदा’ ‘प्रहार: द फायनल अटॅक’, ‘अंगार’, ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्नि साक्षी’, ‘खामोशी: द म्युझिकल’, ‘अब तक छप्पन’, ‘अपहरण’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...