‘आयुष्यात एखादा पुरुष असणं…’; बालपणीच्या मित्रासोबत लग्न, मग घटस्फोट; ही अभिनेत्री 39 व्या वर्षी जगतेय सिंगल आयुष्य
अशी एक प्रसिद्ध अभिनेत्री जिने तिच्या बालमित्राशी लग्न केलं.मात्र काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. आता चाळीशीत ती तिचं आयुष्या सिंगल पण तिच्या नियमांवर जगताना दिसते. दुसऱ्या लग्नाच्या निर्णायाबद्दलही तिने मोकळेपणाने बोलून दाखवलं.

बॉलिवूड असो किंवा मराठी इंडस्ट्री. कलाकारांचं आयुष्य हे थोड्याफार फरकाने हे सारखंच असतं. वैयक्तिक आयुष्यातील कितीतरी बाजू या सारख्याच भासतील. त्यातील एक बाजू म्हणजे लग्न, अफेअर अन् घटस्फोट. बॉलिवूडमध्येही असे अनेक कपल आहेत ज्यांचे लग्न फार काही काळ टिकले नाही आणि आजपर्यंत ते सिंगल आयुष्य जगतायत. अशीच एक मराठी अभिनेत्री आहे जी चाळीशीतही सिंगल आयुष्य जगतेय.
प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणानं बोलते
मराठी इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची लग्न झालेली पण त्यांचा घटस्फोट झाला. आज त्याच अभिनेत्री सिंगल असून प्रोफेशनल आयुष्यात आघाडीवर आहेत. अशीच एक मराठी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. तेजस्विनी कायम तिच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणानं बोलताना दिसते. तेजस्विनी तिच्या चित्रपटांबद्दल, तिच्या भुमिकांबद्दल जेवढी चर्चेत असते तेवढीच ती वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे.
बालपणीच्या मित्रासोबत लग्न अन्…
तेजस्विनीने 16 डिसेंबर 2012 रोजी तिचा बालमित्र भूषण बोपचेसोबत लग्न केलं. पण त्यांचं हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर तेजस्विनी आता वयाच्या 39व्या वर्षी सिंगल आयुष्य जगतेय. एका मुलाखतीदरम्यान, तेजस्विनीला तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली की, ‘माझ्या आयुष्यात एखादा पुरुष असणं किंवा लग्न होणं हे माझं सेटल होणं नाही. मी माझ्या कुटुंबासाठी उभी आहे, मी काम करतेय आणि मी समाधानी आहे. मला कोणत्याही ‘पावती’ची गरज नाही.’ असं तेजस्विनीने म्हणत तिचं लग्नाबद्दलचं मत बोलून दाखवलं.
View this post on Instagram
अभिनयासोबतच निर्मितीक्षेत्रातही पाऊल
दरम्यान कामाबद्दल बोलायचं झालं तर तेजस्विनीने अभिनयासोबतच निर्मितीक्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. शिवाय ती त्यातही यश मिळवताना दिसते. तेजस्विनीने अनेक चित्रपट केले. पण त्यातील ‘तू ही रे’, ‘समांतर’, ‘ये रे ये रे पैसे’ यांसारख्या सिनेमांमधल्या तिच्या भुमिका कायम लक्षात राहणाऱ्या ठरल्या. तसेच तिने काही मराठी मालिकांमध्ये केलेल्या भुमिकाही लोकप्रिय ठरल्या. तसेच तिने ‘येक नंबर’ या सिनेमाची निर्मितीही केली होती.
