Aai Kuthe Kay Karte: ‘अरुंधती सिंड्रोम’मुळे देशमुखांचं घर पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर, कांचनबाईंच्या भीतीला संजना दीक्षित खतपाणी घालणार?

सगळे घरातले अरुंधतीच्या घरी गेल्याने आता घरातले लोक वरच्यावर तिच्या घरी जातील, अशी भिती कांचन व्यक्त करते त्याला संजना खतपाणी घालताना दिसते.

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती सिंड्रोममुळे देशमुखांचं घर पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर, कांचनबाईंच्या भीतीला संजना दीक्षित खतपाणी घालणार?
देशमुख कुटुंब
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 11:58 AM

मुंबई : आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay) ही मालिका लोकप्रियतेच्या सर्वोच्च स्थानी आहे. या मालिकेत काय घडतं, काय बिघडतं याकडे सर्वाचं लक्ष असतं.या मालिकेत सध्या अरुंधती (Arundhati) घर सोडून गेली आणि ती स्वतंत्र राहू लागली आहे. तिने तिच्या नव्या घरात प्रवेश केलाय. मात्र याच दिवशी देशमुखांच्या घरात वादळ येणार असं दिसतंय. कारण अरुंधतीने नव्या घरात प्रवेश केल्यानंतर घरातली मंडळी तिच्या नव्या घरी जातात, हे अनिरुद्ध आणि कांचन यांना पटलेलं नाही. अप्पांच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळे घरातले अरुंधतीच्या घरी गेल्याने आता घरातले लोक वरच्यावर तिच्या घरी जातील, अशी भिती कांचन व्यक्त करते त्याला संजना खतपाणी घालताना दिसते. इतकंच नाही तर ती अभीलादेखील अरुंधती आणि अनघाच्या विरोधात भडकावून देते. त्यामुळे ही मालिका पुढे काय वळण घेणार हे पाहावं लागेल.

देशमुखांचं घर फुटीच्या उंबरठ्यावर

अरुंधतीने नव्या घरात प्रवेश केल्यानंतर घरातली मंडळी तिच्या नव्या घरी जातात, हे अनिरुद्ध आणि कांचन यांना पटलेलं नाही. अप्पांच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळे घरातले अरुंधतीच्या घरी गेल्याने आता घरातले लोक वरच्यावर तिच्या घरी जातील अशी भिती कांचन व्यक्त करते त्याला संजना खतपाणी घालताना दिसते. इतकंच नाही तर ती अभीलादेखील अरुंधती आणि अनघाच्या विरोधात भडकावून देते. त्यामुळे ही मालिका पुढे काय वळण घेणार हे पाहावं लागेल.

अरुंधतीने जरी नवं घर घेतलं असलं तरी या घरात प्रवेश करताना तिला जुने दिवस आठवतात. लग्नानंतर ती ज्या घरात माप ओलांडून गेली त्या घरातून तिला बाहेर पडावं लागलं. तोच सगळा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर आला.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अरुंधती तिच्यासमोर आलेल्या अडचणींचा सामना कसा करेल, त्यात आशुतोष तिची काही मदत करू शकेल का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं या मालिकेच्या पुढील भागांत प्रेक्षकांना मिळतील.

इतर बातम्या

अमिताभ बच्चन यांनी ‘झूंड’चं एक दिवसही प्रमोशन का केलं नाही? चर्चांना उधाण, चांगला पिक्चर रखडतोय?

Poonam Pandey | पूनम पांडेचे सनसनाटी आरोप ईगोमुळे, पती सॅम बॉम्बेच्या आरोपांनी खळबळ

अमिताभ नावाचं गारुड कित्येक वर्षापासूनच आहे; नागराज उगाच म्हणत नाही माझं स्वप्न होतं…