AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसेही खेळले, मुर्खपणा केला, तरी या तिघांना कायम सपोर्ट; बिग बॉसमध्ये किरण मानेंचा पाठिंबा कुणाला

Kiran Mane on Bigg Boss Marathi : अभिनेते किरण माने यांनी बिग बॉस मराठीबद्दल भाष्य केलं आहे. फेसबुक पोस्ट शेअर करत त्यांनी तीन स्पर्धकांना आपला पाठिंबा दिला आहे. किरण माने यांनी नेमका कुणाला सपोर्ट केलाय? त्यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय? वाचा सविस्तर...

कसेही खेळले, मुर्खपणा केला, तरी या तिघांना कायम सपोर्ट; बिग बॉसमध्ये किरण मानेंचा पाठिंबा कुणाला
किरण माने, अभिनेते
| Updated on: Aug 04, 2024 | 7:17 PM
Share

बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सुरु आहे. हा सिझन सुरु होऊन एक आठवडाच झाला आहे. असं असताना या कार्यक्रमात रडारड, भांडणं, टोमणे, आरोपप्रत्यारोप असं सगळं घडताना दिसत आहे. यावरूनच प्रेक्षकांमध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. कोणत्या स्पर्धकाला आपला सपोर्ट असणार? याबाबत सोशल मीडियावर पोस्ट पाहायला मिळत आहेत. अभिनेते आणि बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनमधील स्पर्धक किरण माने यांनीही यावर आपलं मत मांडलं आहे. धनंजय पोवार, सूरज चव्हाण आणि घन: श्याम दराडे या तिघांना किरण माने यांनी पाठिंबा दिला आहे. तशी पोस्ट किरण माने यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.

किरण माने यांची पोस्ट जशीच्या तशी

हे कसेही खेळले, समजा मुर्खपणा केला, तरी माझं प्रेम आणि सपोर्ट या तिघांना रहाणार… तिघं गांवच्या मातीतली आहेत आणि दुसरं म्हणजे शहरी ‘सो काॅल्ड’ सभ्य-असभ्यता, संस्कृती-फिंस्कृती, शुद्ध-अशुद्धता उंच कोलून, रिअल वागून लोकप्रिय होऊन इथवर पोहोचलेली आहेत. इथेही ते जे काहीही कसेही वागतील ते ‘रिअल’ असणार.

या सगळ्यांविषयी मला आदर आहे आणि त्यांना माझ्याविषयी. डीपी आणि छोटा पुढारी माझ्यावर खुप प्रेम करतात. वरचेवर मेसेज सुरू असतात. तिघंबी लै भारीयेत.. ते ज्या पद्धतीचे रील्स बनवतात, ते मला कधीच जमणार नाही. आपली इच्छा नाही, ध्येय नाही, लायकीही नाही.. आणि ठामपणे सांगतो, मी जे अभिनयात, परिवर्तन चळवळीत आणि राजकारणात एकाचवेळी जे काही करतोय तोही त्यांच्या सोडाच, मनोरंजन इंडस्ट्रीत नव्याजुन्या कुणाच्याच तोंडचा घास नाही, दम नाही. फरक समजून घ्यायचा असतो. कोणाला गंमतजंमत करणारी रील्स करून फाॅलोअर्स मिळतात, तर कुणाला विवेकी विचारसरणी मांडून आणि अभिनय करुन.

खोटं वागणार्‍या आणि माकडचाळे करणार्‍यांचं बिगबाॅसमध्ये माकड होतं. हे चार वर्षांपुर्वी माझं मत होतं. पुर्वी मी बिगबाॅसच्या सिझन दोनची ऑफर नाकारली होती, हा त्याचा सणसणीत पुरावा ! बाकी तिथं धुणीभांडी करण्याला मी कधी कमीपणाचं मानलं नाही. ‘बायकांची कामे’ मानून अशा कामांना हिणवणारे बुळगे नामर्द असतात. असो. सिझन चार स्विकारला कारण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. मी मोदीवर टीका करणारी पोस्ट केली. भक्तडुक्कर पिलावळीने प्रचंड उच्छाद मांडला आणि मला सिरीयलमधुन काढुन टाकले. आज मी जिद्दीनं पायर्‍या चढत शत्रूंची थोबाडं ठेचत प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचं वलय कितीतरी पटींनी वाढवलं. ही आत्मप्रौढी फक्त डुक्करपिलावळीसाठी आहे. माझ्या चाहत्यांसमोर मी नम्रच आहे. याचबरोबर बिगबाॅस माझ्यासाठी गाॅडफादर ठरलं. इथं माकड केलं जात नाही, झालं तर आपल्या गुणांनी तो स्पर्धक माकड ठरतो. बिगबाॅस वाघाला वाघ म्हणूनच दाखवतो आणि माकडाला माकड.

…बिगबाॅसचा आधार घेऊन माझ्या काॅन्ट्रोव्हर्सीच्या वेळी केल्या गेलेल्या खोट्या आरोपांवरही मात केली. तिथं अस्सल कॅरॅक्टर जगासमोर येतं. माझ्याबाबतीत प्रेक्षकांनी ते प्रचंड डोक्यावर घेतलं. विशेषत: ग्रामीण भागातली जनता पहिल्यांदा बिगबाॅसकडे वळली आणि मला अभूतपुर्व प्रेम दिलं. माझ्याहून निम्म्या वयाच्या पोरांना धोबीपछाड देत थेट टाॅप थ्री पर्यन्त मजल मारू शकलो ते यामुळेच. गांवोगांवी मिरवणुका निघाल्या. ‘बिगबाॅस पब्लिक विनर किरण माने’ अशा रांगोळ्या काढल्या गेल्या.

बिगबाॅसच्या घरातही मी रोज एक तुकाराम महाराजांचा अभंग अर्थासहित सांगणे.गौतम बुद्ध, छ. शिवराय, जोतीबा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक गोष्टी सांगणे,या जगावेगळ्या गोष्टी केल्या. हे बिगबाॅसमध्ये कधीच घडलं नव्हतंं आणि खात्रीनं सांगतो, यापुढंही हे घडणार नाही. असो.

तर, डीपी, घन:श्याम आणि सूरज…माझ्या मातीतल्या माझ्या बहुजन भावांनो, तुम्ही तुमच्या श्टाईलनं धुमडी उडवा त्या घरात. चिखलात धुरळा आन् पान्यात आग लावा. पुंग्या टाईट करा एकेकाच्या. तुम्हा तिघांनाबी लै लै लै प्रेम… लोकांची मनं जिंका… ते जगात भारी असतं…लब्यू

– किरण माने.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.