AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माज- दादागिरी संपली…; रितेश देशमुखने जान्हवीला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं?

Riteish Deshmukh On Janhavi Killekar : बिग बॉस मराठीच्या घरात सतत नवनव्या गोष्टी घडत असतात. आज शनिवार म्हणजे भाऊचा धक्का... या विकेंड विशेष भागात रितेश देशमुख जान्हवी किल्लेकर हिची शाळा घेताना दिसणार आहे. बिग बॉसच्या घरात काय घडतंय? वाचा सविस्तर,.....

माज- दादागिरी संपली...; रितेश देशमुखने जान्हवीला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं?
बिग बॉस मराठीImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 24, 2024 | 8:44 PM
Share

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील सर्वच सदस्यांनी हा आठवडा चांगलाच गाजवला आहे. या आठवड्यात जान्हवी किल्लेकरला प्रेक्षकांकडून चांगलच ट्रोल करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर तिच्या बिग बॉसच्या घरातील वावराबाबतच्या पोस्ट पाहायला मिळत आहेत. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनेदेखील जान्हवीला तिची जागा दाखवली आहे. रितेशने जान्हवीला कडक शब्दा सुनावलं आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ जान्हवीला माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुला स्थान नाही, असं म्हणताना दिसला. हा प्रोमो सध्या प्रचंड चर्चेत आहे. माज- दादागिरी संपली. मी तुम्हाला घराबाहेर काढतोय दरवाजा उघडा, असं रितेश म्हणताना दिसतोय. त्यामुळे रितेश देशमुखने जान्हवीला बिग बॉसच्या घराबाहेर काढल्याचं दिसत आहे.त्यामुळे आजचा भाऊचा धक्का प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारा आहे.

रितेशने जान्हवीला सुनावलं

‘बिग बॉस मराठी’ च्या या आठवड्यात जान्हवी पॅडी दादांना म्हणाली होती,”आयुष्यभर अॅक्टिंग केली आता इथे येऊन ओव्हरअॅक्टिंग करताय”. त्यावर जान्हवीला सुनावत रितेश भाऊ म्हणाला,”जान्हवी तुम्ही ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील एक वाईट सदस्य आहात. कोणत्या गोष्टीत किती पर्सनस जावं याची लिमिट असते. डिक्शनरीमध्ये ओव्हर हा शब्द फक्त तुमच्यासाठी आहे. या भाऊच्या धक्क्यावर आता मी बंदोबस्त करणार आहे. हा शो फक्त तीन महिन्यांपूरता आहे. लोक इथे करिअर घडवायला येतात. तुम्ही काय संपवायला आला आहात…तुमचा ओव्हर कॉन्फिडिन्स तुम्हाला नडणार आहे.”

रितेश काय म्हणाला?

रितेश देशमुखने तिला नाटकी म्हणत सुनावलं आहे. तुम्ही नाटकी आहात तुम्ही ढोंगी आहात. लोकांना सगळं दिसतंय. तुम्ही मेलोड्रामा करता. सगळे कॅमेरे स्वत:कडे वळवण्याचा प्रयत्न करता. पॅडींची मागितलेली माफी मनापासून होती का? एवढं असूनही पॅडी भाऊंनी मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं. जान्हवी तुम्ही मोठ्या कलाकारांसह छोट्या कलाकारांचाही अपमान करताय. कलाकार छोटा असो किंवा मोठा असो तो कलाकारच असतो. खोटं वागण्याला एक लिमिट असते. आम्हाला असं वाटतं जान्हवी जे करते ते सगळं नाटक आहे, असं रितशे म्हणाला.

‘बिग बॉस मराठी’च्या या घरातली सगळ्यात खोटारडी व्यक्ती जान्हवी आहे. हे सगळं फुटेज आणि क्रेडिटसाठी तुम्ही करताय. करिअर घडवायला किती मेहनत घ्यावी लागते..लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुमचा उर्मटपणा इथे बंद होणार आहे. आजनंतर माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही. तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. मी तुम्हाला तुमची जागा दाखवतो, असं म्हणत रितेशने जान्हवीला सुनावलं आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.