‘झाडांचं शतक आणि शतकांची झाडं’, ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर सयाजी शिंदे आणि मनोज बाजपेयी सांगणार वृक्ष संवर्धनाचं महत्त्व!

| Updated on: Aug 13, 2021 | 11:50 AM

या मंचावर हे दोन्ही दिग्गज कलाकार वृक्षसंवर्धनाचं महत्त्व उलगडून सांगणार आहेत. स्वातंत्र्याची 75 वर्ष पाहिलेल्या आजी-आजोबांच्या हातून झाड लावून ते पुढच्या 20-30 वर्षांनी त्यांच्या नातवाला त्याची सावली मिळणं, हे घडलं पाहिजे असे देवराईचे शिल्पकार अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले.

‘झाडांचं शतक आणि शतकांची झाडं’, ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर सयाजी शिंदे आणि मनोज बाजपेयी सांगणार वृक्ष संवर्धनाचं महत्त्व!
Sayaji Shindi And Manoj Bajpayee
Follow us on

मुंबई : छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या प्रसिद्ध कार्यक्रमाचा मराठी अवतार म्हणजे ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Karodpati). 2019ला या कार्यक्रमाचे पहिले पर्व प्रदर्शित झाल्यावर गेल्यावर्षी कोरोनामुळे या कार्यक्रमाला विश्राम घ्यावा लागला होता. परंतु, आता कोरोना परिसथिती थोडी आटोक्यात आल्यावर आता दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे सूत्रसंचालन ‘सैराट’ फेम नागराज मंजुळे यांनी केले होते व आता दुसऱ्या भागासाठी जेष्ठ अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांची वर्णी लागलीय. मराठी घराघरांत सगळ्यांना सचिन खेडेकर परिचित आहेत. आता या मंचावर ‘कर्मवीर विशेष’ या भागात अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) आणि अभिनेते मनोज जोशी (Manoj Joshi) हजेरी लावणार आहेत.

पाहा प्रोमो :

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर स्वातंत्र्यदिनानिमित्त येणार देवराईचे शिल्पकार सयाजी शिंदे आणि सुपरस्टार मनोज बाजपेयी!’, असे म्हणत हा नाव प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

‘झाडांचं शतक आणि शतकांची झाडं’

या मंचावर हे दोन्ही दिग्गज कलाकार वृक्षसंवर्धनाचं महत्त्व उलगडून सांगणार आहेत. स्वातंत्र्याची 75 वर्ष पाहिलेल्या आजी-आजोबांच्या हातून झाड लावून ते पुढच्या 20-30 वर्षांनी त्यांच्या नातवाला त्याची सावली मिळणं, हे घडलं पाहिजे असे देवराईचे शिल्पकार अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले. तर, ‘झाडांचे गुण गाऊ, झाडांचे गुण घेऊ’ असं म्हणत अभिनेता मनोज बाजपेयींनी देखील त्यांना पाठींबा दर्शवला आहे.

सयाजी शिंदे यांची वृक्षारोपण मोहीम

पर्यावरण दिनाच्या औचित्याने अनेकांचं निसर्गप्रेम जागं होतं. या दिवशी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली जाते. पण पुढे त्याकडे दुर्लक्ष होतं आणि लावलेली रोपंही जळून जाता. मात्र, सह्याद्री देवराई या संस्थेनं झाडांच्या संवर्धनाचं काम नियमीतपणे करण्याचा वसाच घेतला आहे. लोकांनीही या कार्यात जास्तीत जास्त सहभागी व्हावं यासाठी सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी अशा कार्यक्रमात अर्थदान, श्रमदान, वृक्षदान आणि बीजदानाच्या स्वरुपात अनेक पर्याय उपलब्ध केले आहेत. या पर्यायांच्या माध्यमातून लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन ते करतात.

साताऱ्यात दुर्मिळ वनस्पतींचं उद्यान उभारणार

साताऱ्यातही अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून नव्याने उभारल्या जाणाऱ्या दुर्मिळ झाडांच्या उद्यानात ते मेहनत घेताना अनेकदा दिसून येतात. सह्याद्रीच्या पर्वत रांगामधील पश्चिम घाटामध्ये असणाऱ्या दुर्मिळ वनस्पती आणि वृक्ष त्याच बरोबर देशातील इतर राज्यातील 600 च्या वर असलेल्या दुर्मिळ वृक्षांच्या प्रजाती एकाच ठिकाणी लावण्याचा अनोखा प्रयोग साताऱ्यात सुरू करण्यात आला आहे. पुणे-बंगळुरु महामार्गालगत साताऱ्यातील म्हसवे गावाच्या बाजूला हा उपक्रम राबवण्यात येत आहे. महामार्गाजवळील पोलीस गोळीबार मैदानाच्या तब्बल 30 एकर जागेत सह्याद्री देवराई, पोलीस प्रशासन आणि वनविभाग यांच्यावतीने हे अनोखे उद्यान उभारण्यात येत आहे. सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून हे उद्यान उभारले जाणार आहे.

हेही वाचा :

चित्रपटातील ‘तो’ न्यूड सीन पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल, ट्विटरवर ट्रेंड होतंय #BoycottRadhikaApte

 नकळतपणे कार्तिक सांभाळतोय त्याच्या मुलीला…, निर्माण होईल का जिव्हाळा?