
अभिनेत्री अंकिता लोखंडे हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अंकिता लोखंडेची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.

अंकिता लोखंडे हिने फक्त टीव्ही मालिकाच नाही तर चित्रपटांमध्येही धमाका केलाय. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत अत्यंत आलिशान अशा घरात राहते.

अंकिता लोखंडे ही तब्बल 100 कोटी किंमत असलेल्या घरात राहते. तिचे हे घर अत्यंत आलिशान असून खास डेकोरेट करण्यात आलंय. बऱ्याचदा अभिनेत्री आपल्या घराचे फोटो शेअर करताना दिसते.

मुंबईच्या घरात अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत राहते. अंकिता लोखंडे हिच्या या घराची थिम पूर्ण व्हाइट आहे. जवळपास सर्व वस्तू व्हाइटच घरात ठेवण्यात आल्या आहेत.

अंकिता लोखंडे हिच्या घरात मोठ्या बाल्कनी देखील बघायला मिळतात. नेहमीच अंकिता लोखंडे ही आपल्या बाल्कनीतील खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.