
Lataa Saberwal Sanjeev Seth Separation : ये ‘रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लता सबरवाल या अभिनेत्री शेवटी आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने स्वत:च याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. मी माझे पत्नी संजीव सेठ यांच्यापासून विभक्त झाली आहे, असं तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सांगितले आहे.
लता सबरवाल या अभिनेत्रीचे भारतभरात चाहते आहेत. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत तिने केलेल्या भूमिकेमुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते. तिने या मालिकेत हिना खान या अभिनेत्रीच्या आईची भूमिका केली होती. विशेष म्हणजे संजीव सेठ या अभिनेत्यानेही याच मालिकेत हिना खानच्या वडिलांची भूमिका केली होती. म्हणजेच ऑनस्क्रीन नवरा-बायको म्हणून जगलेले आहेत. याच मालिकेतील भूमिकेमुळे त्यांचे भावबंध जुळले होते. मालिकेच्या सेटवरच ते प्रेमात पडले होते. पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
लता आणि संजीव हे दोघेही 2010 साली ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या शूटिंगदरम्यान प्रेमात पडले होते. पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आता लग्नाच्या तब्बल 15 वर्षांनी हे दोघेही विभक्त झाले आहेत. 21 जून 2015 रोजी लताने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे संजीव आणि मी विभक्त झालो आहोत, असे जाहीर केले आहे.
लता आणि संजीव यांना आरव नावाचा एक मुलगा आहे. घटस्फोट घेतल्याचे जाहीर करताना तिने या मुलाचाही उल्लेख केला आहे. संजीवने मला एक छान मुलगा दिल्याबद्दल मी त्याचे आभार मानते, असं तिने म्हटलंय. तसेच आपल्या चाहत्यांना आमच्या खासगी आयुष्याचा आदर करावा, असे आवाहनही केले आहे. लताना संजीव याला त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
संजीव सेठ या अभिनेत्याचे याआधी एक लग्न झालेले आहे. रेशमा टिपणीस हिच्याशी त्याचे पहिले लग्न झाले होते. रेशमापासून संजीव याला मानव नावाचा मुलगा तर रिषिका नावाची मुलगी आहे. दरम्यान, संजीव सेठ आणि लता हे नेमके विभक्त का झाले? याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.