Milind Soman | तब्बल 26 वर्षानंतर मिलिंद सोमण पुन्हा रॅम्प अवतरला, अभिनेत्याच्या लूक पाहून मलायका झाली अवाक्!

‘सुपरमॉडेल ऑफ द इयर 2’ या शोमध्ये मिलिंद सोमणने (Milind Soman) धोतर घालून रॅम्प वॉक केला. या दरम्यान अभिनेत्याचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतात.

Milind Soman | तब्बल 26 वर्षानंतर मिलिंद सोमण पुन्हा रॅम्प अवतरला, अभिनेत्याच्या लूक पाहून मलायका झाली अवाक्!
Milind Soman

मुंबई : ‘सुपरमॉडेल ऑफ द इयर 2’ या शोमध्ये मिलिंद सोमणने (Milind Soman) धोतर घालून रॅम्प वॉक केला. या दरम्यान अभिनेत्याचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतात. चाहत्यांमध्ये अभिनेत्याच्या फिटनेसविषयी नेहमीच चर्चा होत असतात. अशा परिस्थितीत मिलिंद सोमण या दिवसांमध्ये एमटीव्हीच्या ‘सुपरमॉडेल ऑफ द इयर 2′ च्या (MTV show supermodel of the year 2) शोमध्ये दिसत आहे. या शोमध्ये मिलिंदने अतिशय खास पद्धतीने रॅम्प वॉक केला आहे. या दरम्यान, मिलिंदचा लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिलिंद सोमण धोती लूकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रॅम्पवर चालताना दिसत आहे.

चाहत्यांमध्ये मिलिंदच्या लूकची चर्चा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मिलिंदच्या या व्हिडीओमध्ये त्याचे खूप कौतुक केले जात आहे. आम्ही तुम्हाला सांगू की, मिलिंदने तब्बल 26 वर्षांनंतर रॅम्प वॉक केला आहे. अशा परिस्थितीत, 26 वर्षांनंतर, मिलिंद सोमणच्या या लूकमुळे, सोशल मीडियावर त्याची खूप चर्चा सुरु आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

अलीकडेच, ‘सुपरमॉडेल ऑफ द इयर 2’चा नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात मिलिंद सोमण धोती परिधान करून रॅम्पवर चालताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये शोचे स्पर्धक मिलिंद सोमणसोबत पोज देताना दिसत आहेत. मिलिंद सोमणचा हा अवतार पाहून मलायका अरोरा (Malaika Arora)  देखील अवाक् झाली आहे.

एवढेच नाही, तर मिलिंद सोमण धोतीची स्टाईल पाहून मलायका अरोरा फक्त ‘वाह’ म्हणत राहिली. या दरम्यान, मिलिंद स्पर्धकांसोबत इतका जवळ दिसला की, मलायका खूप लाजली आणि तिने चेहरा लपवून घेतला.

मिलिंद सोमणचा हा व्हायरल व्हिडीओ त्याने स्वतः देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, ‘26 वर्षांनंतर… पुन्हा एकदा.’ प्रत्येकजण मिलिंद सोमणच्या या धोतर लूकचे खूप कौतुक होत आहे. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत, मिलिंदची पोस्ट त्यांची जोरदार स्तुती करत आहे. अभिनेत्याचा हा लूकही खूप आवडला आहे.

हेही वाचा :

Adipurush Vs Raksha Bandhan : अक्षय कुमारची प्रभासशी होणार टक्कर!, 2022च्या ‘या’ दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरुष’ विरुद्ध ‘रक्षाबंधन’ सामना रंगणार!

Salman Khan Troll | ‘मास्क न वापरणारा व्यक्ती जेव्हा मास्क लावतो…’, उलटा मास्क परिधान करणारा सलमान खान होतोय ट्रोल!

Myra and Prarthana : ‘अपने पास बोहोत पैसा हैं’ म्हणत मायरा आणि प्रार्थना बेहेरेनं केलं क्यूट फोटोशूट, पाहा फोटो

Thalaivii :  ‘थलायवी’मुळे कंगना रनौतला कायमस्वरूपी ‘स्ट्रेच मार्क्स’, अवघ्या सहा महिन्यात वजन वाढून केले होते कमी!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI