AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाग्यलक्ष्मी’ फेम अभिनेत्याचा अपघात; म्हणाला, मी घाबरलो होतो, मनावर जबरदस्त आघात झाला…

'भाग्यलक्ष्मी' या टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता आकाश चौधरी याच्या कारचा अपघात झाला आहे. एक ट्रकने त्याची कार ठोकली. त्यामुळे त्याच्या कारचा चक्काचूर झाला. पण नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला आहे.

'भाग्यलक्ष्मी' फेम अभिनेत्याचा अपघात; म्हणाला, मी घाबरलो होतो, मनावर जबरदस्त आघात झाला...
Akash Choudhary Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 17, 2023 | 7:04 AM
Share

नवी मुंबई : आपण घराबाहेर पडल्यानंतर आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय हे आपल्याला माहीत नसतं. कधी काय होईल याचा भरवसा नसतो. ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता आकाश चौधरी याच्याबाबतही काहीसे असंच घडलंय. रेड लाइट लागल्यामुळे आकाशची कार थांबली होती. तितक्यात पाठीमागून आलेल्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. पेट डॉगला घेऊन मुंबईपासून दूर सुट्टी घालवण्यासाठी आकाश निघाला होता. तितक्यात त्याला अपघाताला सामोरे जावं लागलं. त्यामुळे त्याच्या मनावर मोठा आघात झाला आहे.

आकाश चौधरीने या अपघाताची माहिती मीडियाला शेअर केली आहे. मी माझ्या पेट डॉगला घेऊन सुट्टी घालवण्यासाठी निघालो होतो. मला पेट डॉग सोबत वेळ घालवायचा होता. नवी मुंबईत आम्ही रेड लाईट लागल्यामुळे थांबलो होतो. मागून एक ट्रक आला आणि त्याने जोरदार धडक दिली. माझी गाडी ड्रायव्हर चालवत होता. मी पेट डॉगसोबत बसलो होतो. ट्रकने धडक दिल्याने अचानक आम्हाला मोठा झटका लागला. त्यामुळे मला प्रचंड शॉक बसला. माझ्या मनावर आघात झाला. मी घाबरून गेलो होतो.

नशीब वाचलो

नशीब. मी सीटबेल्ट लावलेली होती म्हणून वाचलो. मी गाडीतून उतरलो आणि ट्रक चालकाला काय झालं विचारलं. त्यावर त्याने गाडीचा ब्रेक फेल झाल्याचं सांगितलं. माझी चूक झालीय. मला माफ करा, अशी गयावया तो करू लागला. तो गरीब माणूस होता. त्यामुळे मी त्याला काही म्हटलं नाही. विशेष म्हणजे तो गाडी ठोकल्यानंतर पळून गेला नाही. पळून जाण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे मी त्याला सोडून दिलं, असं आकाश म्हणाला.

दोन मिनिटातच पोलीस आले

दोन मिनिटातच तिथे पोलीस आले. पोलिसांनी त्याला अटक केली. पण मी थोड्यावेळाने त्याला जाऊ दिलं. माझ्यासाठी ही घटना पूर्णपणे ट्रॉमेटाइजिंग होती. खरं तर ट्रकने कारला ठोकल्याने कारचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे मला त्यावर खूप खर्च करावा लागला. माझ्याच खिशातून मी हा पैसा खर्च केला, असंही त्याने म्हटलं आहे.

जायचं तर विमानाने जाईल

मी माझ्या चालकासोबत पुन्हा घरी गेलो. दुसरी गाडी घेऊन पुन्हा व्हॅकेशनसाठी निघालो. जेव्हा तुमच्यासोबत असं होतं तेव्हा तुमचा मूड खराब होतो. जेव्हा मी माझ्या आईला अपघाताची माहिती दिली. तेव्हा ती खूप घाबरली होती. जेव्हा मी दुसऱ्यांदा घरातून बाहेर पडलो तेव्हा ती मला वारंवार फोन करून माझ्या प्रकृतीविषयी विचारत होती. खरं सांगायचं म्हणजे लोणावळ्यातून जाताना मी थोडा घाबरून गेलोय. आता जायचं असेल तर विमानानेच जाईल. बाय रोड जाणार नाही, असंही तो म्हणाला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.