Bharti Singh: ‘माफ करा, पण हे चांगलं नाही’, भारती सिंगच्या मुलाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

| Updated on: Jul 25, 2022 | 6:47 PM

भारती तिच्या इन्स्टाग्रामवर मुलाचे अनेक फोटो शेअर करत आहे. मात्र बाळाच्या एका फोटोवरून नेटकऱ्यांनी भारतीवर टीका केली आहे.

Bharti Singh: माफ करा, पण हे चांगलं नाही, भारती सिंगच्या मुलाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
भारती सिंगच्या मुलाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
Image Credit source: Instagram
Follow us on

कॉमेडियन भारती सिंगने (Bharti Singh) 3 एप्रिल रोजी मुलाला जन्म दिला. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या युट्यूब व्लॉगमध्ये पहिल्यांदाच मुलाचा चेहरा दाखवला होता. भारती आणि हर्ष लिंबाचियाने (Haarsh Limbachiyaa) त्यांच्या मुलाचं नाव लक्ष असं ठेवलं आहे. तेव्हापासून भारती तिच्या इन्स्टाग्रामवर मुलाचे अनेक फोटो शेअर करत आहे. मात्र बाळाच्या एका फोटोवरून नेटकऱ्यांनी भारतीवर टीका केली आहे. भारती सिंहने मुलाचा नवा फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये लक्ष्य म्हणजेच गोला हा अरबी लूकमध्ये पहायला मिळत आहे. त्याच्या डोक्यावर काफिया (स्कार्फ) बांधला आहे. गोला डोळे मिटून खुर्चीवर बसला आहे. त्याच्या जवळ हुक्कादेखील (Hookah) ठेवण्यात आला आहे.

हुक्क्याबद्दल नेटकऱ्यांचा आक्षेप

गोलाच्या या फोटोवर भारतीचे इंडस्ट्रीतील मित्रमैत्रीण आणि चाहते कमेंट्स करत आहेत. अनेकांनी फोटोतील हुक्क्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. तर काहींनी भारतीच्या मुलाची तुलना करीना कपूरचा मुलगा तैमूरशी केली आहे. एका चाहत्याने हुक्क्याबाबत नाराजी व्यक्त करत म्हटलं की, ‘बाकी सर्व ठीक आहे, पण हुक्का कोणत्या आनंदात ठेवला आहे?’ तर आणखी एका युजरने लिहिलं आहे, ‘तुम्ही आतापासूनच मुलाला बिघडवत आहात.’ एका चाहत्याने म्हटलं, ‘मुलाजवळ हुक्का का ठेवला आहे?’ ‘बाळ खूप गोंडस दिसत आहे पण थीम आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. क्षमस्व, परंतु हे चांगले नाही,’ असं एका नेटकऱ्याने लिहिलं. एका चाहत्याने लक्ष्यचं नवीन नावही ठेवलं आहे आणि त्याला गोला हबीबी सिंग लिंबाचिया असं म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यात ती कामावर रुजू झाली होती. कलर्स वाहिनीवरील ‘हुनरबाज’ या टीव्ही शोचं सूत्रसंचालन हर्ष आणि भारती मिळून करत आहेत. यासोबतच ते ‘द खत्रा खत्रा शो’ याचंही सूत्रसंचालन करत आहेत. या वेळापत्रक मोठा खंड पडू नये यासाठी भारती बाळंतपणानंतर फार मोठी सुट्टी न घेता लगेच कामावर रुजू झाली.