रितेश भाऊच्या धक्क्यावर ‘फ्रेंडशिप डे’ सेलिब्रेट; जुळणार नव्या मैत्रीची नवीन समीकरणं

Big Boss Marathi Friendship Day : बिग बॉस मराठीचा पहिला आठवडा पूर्ण झाला आहे. या आठवड्याचा 'भाऊचा धक्का' पार पडला. यावेळी रितेश देशमुख एका वेगळ्या रंगात पाहायला मिळाला. त्याने आक्रमक होत घरच्या सदस्यांच्या चूका दाखवून दिल्या. काय घडलं? वाचा सविस्तर...

रितेश भाऊच्या धक्क्यावर 'फ्रेंडशिप डे' सेलिब्रेट; जुळणार नव्या मैत्रीची नवीन समीकरणं
बिग बॉस मराठीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 10:38 PM

आज जागतिक फ्रेंडशीप डे आहे. यानिमित्त सगळेच मित्र मैत्रिणी एकमेकांना शुभेच्छा देताना दिसतात. बिग बॉस मराठीच्या घरातही फ्रेंडशीप डे साजरा झाला. मैत्री म्हटलं की मजा, मस्ती आणि भांडण हे आलंच. ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊन आठवडा पूर्ण झाला असून आठवड्याभरातच घरातील सदस्यांमधील मैत्रीचं नातं अलगद फुलताना दिसून येत आहे. आज जगभरात फ्रेंडशिप डे साजरा होत आहे. रितेश भाऊच्या धक्क्यावरदेखील ‘फ्रेंडशिप डे’ साजरा झाला. नव्या मैत्रीची नवीन समीकरणं पाहायला प्रेक्षकांनादेखील आवडेल.

बिग बॉसच्या घरात फ्रेंडशीप डे

‘बिग बॉस मराठी’ च्या घरातील सदस्य एकमेकांच्या मागे बरंच काही बोलताना दिसून येतात. पण आज रितेश भाऊने त्यांना आमने-सामने उभं केलेलं पाहायला मिळाले. तसंच त्यांच्या मनातील पोल खोल देखील केली. फ्रेंडशिप डेनिमित्त ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर ‘दोस्तीत कुस्ती आणि फुल ऑन मस्ती’ पाहायला मिळाली. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा फ्रेंडशिप डे स्पेशल प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये घरातील सदस्य फ्रेंडशिप डेचं खास लॉकेट एकमेकांना देत ‘मैत्री दिन’ साजरा करताना दिसत आहेत. भित्रा मित्र, दगाबाज मित्र, खोटारडा मित्र, बालिश मित्र, डबलढोलकी मित्र, असे वेगवेगळे लॉकेट सदस्य त्यांच्या मित्रांना घालताना दिसून येत आहेत.

प्रोमोमध्ये योगिता छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडेला ‘डबलढोलकी मित्र’ हे लॉकेट देताना दिसून येत आहे. त्यावर घन:श्याम म्हणतो,”बघितलं ग्रुपची ताकद किती असते”. यावर योगिता म्हणते,”कृपया मला बोलू द्या”. तर छोटा पुढारी म्हणतो,”बोला.. आठ दिवस बोलली नाही…आता बोला.”

सरप्राईज काय?

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनच्या ‘भाऊच्या धक्क्या’चा नवा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतोय,”‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सरप्राईजचा आहे. पण आता मी एक सरप्राईज देणार आहे. कोणालाच माहिती नाही, यंदा ‘बिग बॉस’ने एका प्रेक्षकाला या घरात एन्ट्री दिली आहे. ते घरातच आहेत.. त्यांची घरावर नजर आहे.. ते लपूनछपून तुमचा खेळ पाहतायत, दाद देत आहेत… पण स्वत: काहीही करत नाहीत. त्या प्रेक्षकाला मी तुमच्यासमोर बोलावतोय.. आणि ते प्रेक्षक आहेत पंढरीनाथ कांबळे”.. त्यानंतर पॅडीने दिलेल्या लूकवर रितेश त्याला असा लूक देऊ नको असं म्हणतो”.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.