Bigg Boss 15 : तेजस्वीला बोलताना पुन्हा एकदा करण कुंद्राची जीभ घसरली, म्हणाला…

लोकप्रिय शो ‘बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) गेल्या काही दिवसांपासून दोन नावे अत्यंत चर्चेत आहेत. ते म्हणजे तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundrra). चाहत्यांना दोघांना एकत्र पाहणे आवडते आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर दोघांनाही ‘तेजरन’ असा टॅग दिला आहे.

Bigg Boss 15 : तेजस्वीला बोलताना पुन्हा एकदा करण कुंद्राची जीभ घसरली, म्हणाला...
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 8:27 AM

मुंबई : लोकप्रिय शो ‘बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) गेल्या काही दिवसांपासून दोन नावे अत्यंत चर्चेत आहेत. ते म्हणजे तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundrra). चाहत्यांना दोघांना एकत्र पाहणे आवडते आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर दोघांनाही ‘तेजरन’ असा टॅग दिला आहे. मात्र, सलमान खानने (Salman Khan) वीकेंडच्या वारमध्ये करण कुंद्राला चांगलेच धारेवर धरले होते. इतकेच नव्हेतर कश्मीरा शाह, देबिना बॅनर्जी यांनी देखील करण तेजस्वीला टास्कदरम्यान सपोर्ट करत नसल्यामुळे चांगलेच सुनावले होते.

पुन्हा एकदा करण आणि तेजस्वीमध्ये वाद

वीकेंडच्या वारनंतर तेजस्वी करणला विचारते की, तू उमर आणि रश्मीला बोलला नव्हता का? यावर करण म्हणतो की, उमर आणि रश्मीने त्याला सांगितले होते की, ते फेयर खेळणार आहेत. मात्र, या दोघांनीही शमिताला पाठिंबा देण्याचे आधीच ठरवले होते, असे तेजस्वीने सांगितले. तेजस्वीने शमिता शेट्टी आणि करण कुंद्रा, निशांत यांच्या मैत्रीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तेजस्वीचे हे शब्द ऐकून करणला राग आला आणि रागाच्या भरात तो तेजस्वींनीला म्हणाला की, “तेजा तू खूप स्वार्थी आहेस यार, तुला किती सपोर्ट मिळाला आहे. सलमान सर, शोमध्ये आलेले सर्व पाहुणे तुम्हाला सपोर्ट करतात, मग तुम्हाला आणखी काय हवे आहे.

बिग बॉस 15 च्या घरामध्ये सर्वात फेमस आणि चाहत्यांच्या आवडतीची तेजस्वी आणि करणची जोडी आहे. मात्र, घरातील काही गोष्टींमुळे करण आणि तेजस्वीमध्ये वाद होताना दिसत आहेत. शमिता शेट्टीला सपोर्ट करण्यासाठी नेहा भसीन बिग बाॅसच्या घरामध्ये आली होती. शमिता शेट्टीची बाजू घेत नेहा भसीनने बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना चांगलेच धारेवर घेतले. यावेळी नेहा भसीन अभिजीत बिचकुलेमध्ये देखील वाद झाला होता.

संबंधित बातम्या : 

Aamir Khan’s Daughter | सलग 15 दिवस आमीरच्या मुलीचा उपवास! वजन घटलं की वाढलं? उत्तर इरा खानने दिलंय

I am Not Done Yet | कपिल शर्माने पुन्हा एकदा घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची फिरकी, म्हणाला….