Bigg Boss 16 | गाैतम विज घराबाहेर? वाचा काय घडले बिग बाॅसच्या घरात

गाैतमचा गेम सुरूवातीला चांगला होता. मात्र, साैंदर्यामुळे त्याचा गेम खराब झाला आहे.

Bigg Boss 16 | गाैतम विज घराबाहेर? वाचा काय घडले बिग बाॅसच्या घरात
| Updated on: Nov 18, 2022 | 6:01 PM

मुंबई : बिग बाॅसशी संबंधीत एक बातमी पुढे येत असून गाैतम विज बिग बाॅसच्या घराबाहेर पडला असल्याची चर्चा सुरू आहे. गाैतमचा गेम सुरूवातीला चांगला होता. मात्र, साैंदर्यामुळे त्याचा गेम खराब झाला आहे. इतकेच नाही तर त्यांचा लव्ह अॅंगलही प्रेक्षकांना आवडला नाहीये. बिग बाॅसच्या घरात गाैतम काहीच करताना दिसत नाही. या आठवड्यामध्ये गाैतम नाॅमिनेशनमध्ये होता. आता गाैतम घराच्या बाहेर आल्याचे सांगितले जातंय.

ऋचा गेरा ही गाैतमची एक्स वाईफ आहे. ऋचा गेराने एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हटले आहे की, साैंदर्यापेक्षा गेमवर गाैतमने लक्ष देण्याची गरज आहे. इतकेच नाही तर ऋचा म्हणाली की, मी लहानपणापासून गाैतमला खूप चांगल्या पध्दतीने ओळखते.

आजही आमच्यामध्ये खूप चांगली एक मैत्री नक्कीच आहे. परंतू तुमची मैत्री आणि प्रेम हे वेगळे आहे. लग्न केल्यानंतर बऱ्याच वेळा कामामुळे आपण आपल्या जोडीदाराला वेळ देऊ शकत नाहीत. आमचा घटस्फोट झाला तरीही आज आम्ही दोघे मित्र आहोत. माझी अगोदरचपासूनच इच्छा होती की, गाैतमने बिग बाॅसमध्ये जावे.

गाैतम बिग बाॅसमध्ये गेल्यामुळे नाही तर मी अगोदरपासूनच बिग बाॅस पाहते. मी अनेकदा गाैतमला म्हटले होते की, तू बिग बाॅसमध्ये जा. जेंव्हा गाैतमला बिग बाॅसकडून काॅल आला तेंव्हा सर्वांत अगोदर याबद्दल गाैतमने मलाच माहिती दिली होती.

लव्ह अॅंगलपेक्षा गाैतमने गेमवर लक्ष देणे आवश्यक आहे. बाहेर प्रेम करण्यासाठी खूप वेळ आहे, असे मला वाटते. गाैतम कोणत्याही नात्यासाठी खूप जास्त वेळ घेतो. विशेष म्हणजे एक मित्र म्हणून गाैतम खूप जास्त चांगला आहे, परंतू एक बॉयफ्रेंड म्हणून तितका जास्त नाही.