Drishyam 2 Review | दृश्यम 2 मध्ये मनोरंजनाचा डबल डोस, वाचा चित्रपटाचा संपूर्ण रिव्ह्यू

गोव्याचे नवे आयजसी अर्थात अक्षय खन्ना हे मीरा देशमुखचे खास मित्र असल्यामुळे मीरा अक्षयला भेटून पुन्हा एकदा ही केस ओपन करण्याचे बोलते.

Drishyam 2 Review  | दृश्यम 2 मध्ये मनोरंजनाचा डबल डोस, वाचा चित्रपटाचा संपूर्ण रिव्ह्यू
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 4:43 PM

मुंबई : दृष्यम 2 ची स्टोरी तिथून सुरू होते, जिथे पहिला भाग संपतो. सॅमच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. तब्बू म्हणजेच चित्रपटातील आयजी मीरा देशमुख पोलिस दलातून निवृत्त झाली आहे. मात्र, गोव्याचे नवे आयजी अर्थात अक्षय खन्ना म्हणजे चित्रपटातील तरुण अहलावत हे मीरा देशमुखचे खास मित्र असल्यामुळे मीरा अक्षयला भेटून पुन्हा एकदा ही केस ओपन करण्याचे बोलते. त्यानंतर परत एकदा विजय साळगावकरची केस ओपन करून चाैकशीस सुरूवात होते. दृष्यम 2 ची स्टोरी सात वर्ष पुढे दाखवण्यात आलीये. मात्र, सॅमच्या हत्येला आता तब्बल सात वर्ष होऊनही विजयचे कुटुंबिय दहशदमध्ये जीवन जगतात. इतके नाही तर विजयची बायको अजूनही पोलिसांना पाहून घाबरते.

दृष्यम 2 ची नेमकी स्टोरी काय वाचा

दृष्यमच्या पहिल्या भागामध्ये दाखवण्यात आले आहे की, आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी विजय साळगावकर काहीही करण्यास तयार आहे. इतकेच नाही तर अनेकदा विजय साळगावकरने म्हटले आहे की, मी माझ्या कुटुंबाशिवाय राहू शकत नाही आणि त्यांच्यासाठी काहीही करू शकतो. दृष्यम 2 मध्ये विजय म्हणजेच अजय देवगण ‘सच पेड के बीज की तरह होता है, हे बोलताना दिसतोय.

सात वर्षांनंतर विजयने त्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. तो एका सिनेमा हॉलचा मालक झाला आहे. विशेष म्हणजे आता विजयला त्याच्या स्टोरीवर एक चित्रपट तयार करायचा आहे. विजयची मुलगी अंजू आजही भूतकाळातील घटनांमुळे भीतीमध्ये असते. पत्नी नंदिनी आजही भूतकाळामुळे चिंतेत असते. गोव्याचा नवा आयजी तरुण अहलावत हा मीरा देशमुखचा खास मित्र आहे. मीरा नवऱ्यासोबत लंडनला राहते. मात्र, मुलाच्या पुण्यतिथीनिमित्त ती गोव्यात येते. त्यावेळी ती तरुणची भेट घेते. मीराला काहीही करून विजयकडून सत्य काढून घ्यायचे आहे आणि त्याला शिक्षा द्यायची आहे.

आयजी तरुण अहलावत नव्याने केसचा तपास सुरू करतो. यामुळे आता विजय साळगावकरच्या कुटुंबियांचा अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. मात्र, विजयच्या कुटुंबियांचा गुन्हा पुढे येणार की, नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागणार आहे. चित्रपटाची सुरूवात स्लो झालीये, मात्र, त्यानंतर चित्रपट प्रेक्षकांना जोडून ठेवतो. दृष्यमच्या पहिल्या भागामध्ये तब्बूचा रोल महत्वाच्या आणि बराच मोठा दाखवण्यात आला होता. मात्र दृष्यम 2 मध्ये तब्बू फार कमी दिसते. इतकेच नाही तर विजयची छोटी मुलगी तिलाही फार कमी वेळ चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पहिल्या भागामध्ये तिचीही भूमिका महत्वाची होती.

पहिल्या भागाप्रमाणेच विजयची पत्नी या भागामध्ये भीतीमध्ये दिसते. तिच्याही रोलमध्ये काही खास बदल करण्यात आले नाहीयेत. चित्रपटाची सुरूवात फार स्लो आहे, याऐवजी ती दणदणीत व्हायला हवी होती. चित्रपटामध्ये सात वर्ष पुढची स्टोरी दाखण्यात आलीये. मात्र, यादरम्यान मोठी चूक करण्यात आली असून विजय ज्या कॅन्टीनमध्ये बसून चहा प्यायचा ती कॅन्टीन अगोदरच्या भागामध्ये दाखवण्यात आली तशीच आहे, सात वर्षांमध्ये त्यात काहीच बदल झाले नाहीत?

अजय देवगणचा जबरदस्त अभिनय

पहिल्या भागाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. मात्र,त्यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर दिग्दर्शनाची कमान अभिषेक पाठकच्या हाती असून प्रेक्षकांना जोडून ठेवण्यात नक्कीच अभिषेकला यश मिळाले आहे. अजय देवगणच्या अभिनयामुळेच चित्रपटामध्ये जीव आहे. विशेष म्हणजे पुन्हा एकदा त्याच उर्जेने विजयने चित्रपटात धमाकेदार अभिनय केला आहे. दृष्यम 2 हा 2021 मध्ये आलेल्या मल्याळम चित्रपट दृष्यम 2 चा रिमेक आहे आणि तो OTT वर देखील उपलब्ध आहे.

दृश्यम् 2 

कलाकार: अजय देवगण,अक्षय खन्ना,तब्बू,श्रिया सरन,इशिता दत्ता 

दिग्दर्शक : अभिषेक पाठक
Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.