गर्लफ्रेंड सबासाठी हृतिक रोशनने घेतला मोठा निर्णय? काय आहे ‘मन्नत’शी कनेक्शन?

प्रेमासाठी कायपण! रिलेशनशिपमध्ये हृतिक-सबाचं एक पाऊल पुढे

गर्लफ्रेंड सबासाठी हृतिक रोशनने घेतला मोठा निर्णय? काय आहे 'मन्नत'शी कनेक्शन?
Hrithik Roshan and Saba AzadImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 3:39 PM

मुंबई: अभिनेता हृतिक रोशन हा गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. हे दोघं सोशल मीडियावर एकमेकांविषयी प्रेम जाहीर करताना दिसतात. इतकंच नव्हे तर विविध कार्यक्रमांमध्येही त्यांनी एकत्र हजेरी लावली. सबा आणि हृतिकला अनेकदा एकत्र व्हेकेशनवरही जाताना पाहिलं गेलं आहे. आपल्या नात्याबद्दल हे दोघं मोकळेपणे व्यक्त होत असतानाच आता हृतिकने सबासाठी मोठा निर्णय घेतल्याचं कळतंय. हृतिक आणि सबा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार असल्याचं कळतंय.

हृतिक आणि सबा हे गेल्या काही दिवसांपासून लिव्ह-इनमध्ये राहण्याचा विचार करत होते. अखेर दोघांनी एक घरसुद्धा पसंत केलं आहे. मुंबईतील ‘मन्नत’मध्ये हे दोघं एकत्र राहणार आहेत. आता मन्नत म्हटल्यावर अनेकांना शाहरुख खानचा बंगला आठवत असेल. मात्र हृतिक आणि सबा ज्याठिकाणी राहणार आहेत, त्या इमारतीचं नावसुद्धा मन्नत आहे.

हे सुद्धा वाचा

या इमारतीतील वरचे मजले हे नव्याने बांधण्यात आले आहेत. त्यामुळे हृतिक आणि सबा लवकरच तिथे राहण्यासाठी जाणार आहेत. हृतिकने याआधी त्याच्या दोन घरांसाठी तब्बल 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. जुहू-वर्सोवा लिंक रोडजवळ ही दोन घरं आहेत. आता सबासोबत राहण्यासाठी त्याने 30 कोटी रुपये खर्च केल्याचं कळतंय.

हृतिक आणि सुझान खान यांचा घटस्फोट झाल्यानंतर दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे गेल्याचं पहायला मिळतंय. हृतिक सबाला डेट करत असतानाच सुझान ही अर्सलान गोणीला डेट करतेय. हृतिक आणि सुझानला हृदान आणि रेहान ही दोन मुलं आहेत. विशेष म्हणजे सबा आणि सुझान यांच्याचही चांगली मैत्री झाली आहे.

हृतिक आणि सबाच्या वयात जवळपास 17 वर्षांचं अंतर आहे. हृतिकच्या कुटुंबीयांशीही सबाची जवळीक वाढली आहे. त्याच्या कुटुंबीयांसोबत मिळून तिने जेवण केलं होतं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हृतिक आणि सबाची पहिल्यांदा ओळख ही ट्विटरवर झाल्याचं म्हटलं जातं. हृतिकने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये सबा एका रॅपरसोबत दिसत होती. त्यानंतर सबाने हृतिकचे आभार मानले आणि दोघांचा संवाद सुरू झाला.

Non Stop LIVE Update
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....