Bigg Boss 16 | अर्चनासोबत झालेल्या वादावर ‘सुंबुल ताैकीर’च्या वडिलांनी दिली मोठी प्रतिक्रिया

सुंबुल बिग बाॅसच्या घरात जाऊन मोठा धमाका नक्कीच करेल. मात्र, प्रत्यक्षात सुंबुल बिग बाॅसच्या घरात फक्त दोनच गोष्टी करताना दिसली.

Bigg Boss 16 | अर्चनासोबत झालेल्या वादावर सुंबुल ताैकीरच्या वडिलांनी दिली मोठी प्रतिक्रिया
| Updated on: Nov 08, 2022 | 9:34 AM

मुंबई : बिग बाॅस 16 च्या सुरूवातीच्या काळात सर्वाधिक चर्चा ही इमली अर्थात सुंबुल ताैकीरची होती. अनेकांना असे वाटत होती, सुंबुल बिग बाॅसच्या घरात जाऊन मोठा धमाका नक्कीच करेल. मात्र, प्रत्यक्षात सुंबुल बिग बाॅसच्या घरात फक्त दोनच गोष्टी करताना दिसत आहे. एक म्हणजे शालिन भनोटच्या मागे फिरणे आणि दुसरे म्हणजे रडताना. बिग बाॅसच्या निर्मात्यांनी सुंबुलचा खेळ सुधारण्यासाठी आणि ती ज्याकाही चुका करत आहे, त्या रोखण्यासाठी तिच्या वडिलांना बिग बाॅसच्या मंचावर आणले होते.

सुंबुल ताैकीरच्या वडिलांनी सुंबुलचा चांगलाच क्लास घेत शालिन आणि टीनापासून लांब राहा, असे बजावले होते. कारण सुंबुल बाहेर अत्यंत चुकीची दिसत होती. इतकेच नाही तर स्वत: सलमान खान याने देखील सुंबुलला काही गोष्टी समजून सांगितल्या होत्या.

सुंबुलच्या वडिलांनी आणि सलमान खान याने सुंबुलला काही गोष्टी सांगूनही सुंबुल आपला खेळ सुधारू शकली नाहीये. इतकेच नाही तर वडिलांनी शालिनपासून दूर राहायला सांगितलेले असताना देखील सुंबुल अजूनही शालिनसोबच आहे. सुंबुलने स्वत: च्या वडिलांचे देखील ऐकले नाहीये.

बिग बाॅसच्या घरात अर्चना गाैतम आणि सुंबुलचे भांडणे होतात. या भांडणामध्ये अर्चना सुंबुलला म्हणते की, तू तुझ्या वडिलांचे ऐकत नाहीस, तू दुसऱ्या कोणाची होणार? यावर सुंबुल संतापते आणि अर्चनासोबत जोरदार भांडणे करते. यावेळी सुंबुल अर्चनाला मारण्यासाठी जाते, परंतू घरातील इतर सदस्य सुंबुलला तसे करू देत नाहीत.

सुंबुल आणि अर्चनाच्या भांडणांनंतर आता सुंबुलच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, माझ्या मुली माझ्याबद्दल कोणी काही चुकीचे बोलत असतील तर कधीच ऐकून घेऊ शकत नाहीत. सुंबुलने माझ्या काही गोष्टी ऐकल्या नाहीत पण कोणी माझे कुठल्या विषयासाठी नाव घेत असेल तर तिला नक्कीच राग येणार.