मुंबई : शुक्रवारी बाॅक्स ऑफिसवर कतरिना कैफ, जान्हवी कपूर आणि सोनाक्षी सिन्हा या तीन अभिनेत्रींचे चित्रपट रिलीज झाले. मात्र, चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले असले तरीही चित्रपटांना प्रेक्षकांचा अजिबातच प्रतिसाद मिळाला नाहीये. जान्हवीचा मिली आणि सोनाक्षी सिन्हाचा डबल XL या चित्रपटांकडे तर प्रेक्षकांनी पाठच फिरवली आहे. कतरिना कैफचा फोन भूत चित्रपट ठीक ठीक कमाई करतोय. फोन भूतमध्ये कतरिना कैफ मुख्य भूमिकेत असूनही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाहीये.