Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरातून शिवलीला बाहेर, पाहा नेमकं काय झालं?

| Updated on: Sep 30, 2021 | 10:55 AM

इतर 14 स्पर्धकांसोबत युवा कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटीलने (Shivlila Patil) देखील या घरात एण्ट्री केली होती. आपल्या कीर्तनाने श्रोत्यांचे कान तृप्त करणारी शिवलीलाचे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात येणे रुचलेले नाहीये.

Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरातून शिवलीला बाहेर, पाहा नेमकं काय झालं?
Shivlila
Follow us on

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची (Bigg Boss Marathi 3) जोरदार सुरुवात झाली आहे. आता घरातील स्पर्धक एकमेकांसोबत खऱ्याअर्थाने स्पर्धा करायला सुरुवात करत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील 15 चर्चित नाव या घरात नांदणार आहेत. विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी यंदा घरात प्रवेश केला आहे. मात्र, आठवडाभारतच आता शिवलीला बाहेर पडली आहे.

कुठलेही एलिमिनेशन किंवा स्पर्धेमुळे शिवलीला बाहेर पडलेली नसून, तब्येत ठीक नसल्याने तिला वैद्यकीय उपचारांसाठी हे घर सोडावे लागले आहे.

पाहा व्हिडीओ :

‘या आठवड्यातील नॅामिनेटेड सदस्या शिवलीला पाटील यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्या काही काळ डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचारांकरिता बिग बॅासच्या घराबाहेर असतील. त्यामुळे आजपासून व्होटिंग लाईन्स बंद असतील याची कृपया नोंद घ्यावी’, असे म्हणत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

इतर 14 स्पर्धकांसोबत युवा कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटीलने (Shivlila Patil) देखील या घरात एण्ट्री केली होती. आपल्या कीर्तनाने श्रोत्यांचे कान तृप्त करणारी शिवलीलाचे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात येणे रुचलेले नाहीये. सोशल मीडियाद्वारे अनेक चाहत्यांनी कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

चाहत्यांनी केली टीका!

शिवलीलाच्या एका श्रोत्याने कमेंट करत म्हंटले की, ‘ताई, मला वाटतं हा तुमचा निर्णय चुकीचा ठरेल.’ तर, दुसऱ्याने म्हटले की, ‘खर तर यांना बिग बॉसच्या घरात यायची गरज नव्हतीच. शिवलीलाताई तुम्ही कीर्तनकार आहात तुमची समाजाला गरज आहे बिग बॉसला नाही’. ‘त्या घरात काही अध्यात्मिक सत्वगुणी वातावरण नसतं. त्या घरात तमोगुणी वातावरण असतं. तिथं जेवणाचं काय..? मांस आणि अंडी त्याच किचन मध्ये बनतं जिथं शाकाहारी भोजन बनतं. आपण एका शुद्ध वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतोय याचं भान असू द्या. अध्यात्मिक पतन खूप महागात पडतं. ज्या प्रमाणे श्रीमद भागवत मध्ये महाराज नहूस यांचं पतन झालं तसं तुमचं पण अध्यात्मिक पतन होईल. नाहूस महाराज धर्मराज युधिष्ठिर महाराजांना व्यक्तीचे पतन होण्याची कारणे सांगतात. नाहूस महाराज म्हणतात “पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पैसा” या चार गोष्टी मुळे व्यक्ती चे पतन होते. अजून वेळ गेली नाही योग्य निर्णय घ्या.’, असे देखील एका चाहत्याने म्हटले आहे.

कोण आहे शिवलीला पाटील?

युवा कीर्तनकार शिवलीला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिचे कीर्तनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. शिवलीला वयाच्या 5व्या वर्षापासून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करते. ग्रामीण भाषा आणि प्रमाण मराठी भाषेतून अगदी विनोदी पद्धतीनं ती कीर्तन करते. तिची ही खास आणि हटके स्टाईल चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरते. तिच्या मोठा चाहता वर्ग आहे.

हेही वाचा :

Birthday special: वेगळ्या धाटणीच्या सिनेमांनी बॉलिवूडची उंची वाढवणारे ऋषीकेषदा; जाणून घ्या ऋषिकेष मुखर्जींच्या टॉप सिनेमांविषयी!

कधीकाळी जाहिरातीतून केली होती करिअरची सुरुवात, आता बॉलिवूडवर राज्य करतायत ‘हे’ कलाकार!