Priyanka Chopra मुलीला घेऊन भारतात कधी येणार?, परिणीती चोप्रा म्हणाली…

बाळाच्या जन्मानंतर अजूनपर्यंत प्रियांका चोप्रा भारतात आलेली नाही. याविषयी प्रियांकाची बहिण अभिनेत्री परिणीती चोप्राला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने याचं उत्तर दिलं आहे.

Priyanka Chopra मुलीला घेऊन भारतात कधी येणार?, परिणीती चोप्रा म्हणाली...
प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा
| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 7:32 PM

मुंबई : बॉलिवुड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस (Priyanka Chopra Jonas) आणि निक जोनस (Nick Jonas) यांनी नुकतंच एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्रियांका सध्या तिचा पती निकसोबत कॅलिफोर्नियातील लॉस ऐंजेलिस या शहरात राहाते.बाळाच्या जन्मानंतर अजूनपर्यंत प्रियांका चोप्रा भारतात आलेली नाही. याविषयी प्रियांकाची बहिण अभिनेत्री परिणीती चोप्राला (Parineeti Chopra) प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने याचं उत्तर दिलं आहे. हुनरबाज (Hunarbaaz) या रिअॅलिटी शोमध्ये परिणीतीला हा प्रश्न विचारण्यात आला.

प्रियांका चोप्रा भारतात कधी येणार?

प्रियांकाची बहिण अभिनेत्री परिणीती चोप्राला प्रियांका बाळाला घेऊन भारतात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने याचं उत्तर दिलं आहे. हुनरबाज या रिअॅलिटी शोमध्ये तिला हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने ती अजून लहान असल्याचं म्हटलं.

कॉमेडियन भारतीचा पती हर्ष याने “मला तुला काही सांगायचं आहे”, असं परिणिताला म्हटलं. “मी तुझ्याबद्दल एक गोष्ट सध्या मी ऑबजर्व्ह केली आहे. परिणिती तू आधी ‘क्लासी’ अॅक्ट्रेस होतीस आता तू ‘मासी’ अॅक्ट्रेस झाली आहेस. पण तू एक काम कर पहिल्या फ्लाईटने प्रियांकाच्या मुलीला इकडं मुंबईत बोलावून घे”, असं हर्ष म्हणाला. त्यावर “अरे अजून ती खूप छोटी आहे”, असं परिणिती म्हणाली. त्यावर पर्ष म्हणाला तर “मग तिला लहान वयातच स्टार बनवूयात ना… कारण मुंबई डान्स इंडिया जुनिअर्सचे ऑडिशन होत आहेत….” त्यावर भारतीने त्याचं विधान दुरूस्त केलं आणि “हा कार्यक्रम 4 ते 14 वर्षांच्या मुलांसाठी होत आहेत”, असं भारती म्हणाली. कलर्स टीव्हीने याचा व्हीडिओ शेअर केला आहे.

प्रियंका चोप्राने 2018 साली गायक निक जोनाससोबत लग्न केलं होतं. पालक होण्यासाठी या दोघांनी सरोगसीचा पर्याय निवडला. 22 जानेवारीला प्रियांकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रियांका आणि निक यांनी आपण पाल झाले असल्याची माहिती दिली होती.

“तू अमिताभ बच्चनसोबत काम करताना वाटलं, साला आपणच काम करतोय!”, Hemangi Kavi कडून Chhaya Kadam यांच्या Jhund मधील कामाचं कौतुक

Jitendra Joshiच्या ‘गोदावरी’चा सातासमुद्रापार झेंडा, न्यूयॅार्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलसाठी सिनेमाची निवड

ब्लाऊजवर शॉर्ट! Rasika Sunil ची नवी स्टाईल, म्हणाली “डान्सिंग अलोन”, ‘एकटी आहे तर मग फोटो कोण काढतंय?’, नेटकऱ्यांचा सवाल