AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Debina Bonnerjee: अभिनेत्री डेबिना दुसऱ्यांदा गरोदर; चार महिन्यांपूर्वीच दिला मुलीला जन्म

गुरमीत आणि डेबिनाने ‘रामायण’ या मालिकेत एकत्र काम करून लोकप्रियता मिळवली. 2008 मध्ये प्रसारित झालेल्या या मालिकेने दोघांनाही प्रेक्षकांची पसंती मिळवून दिली.

Debina Bonnerjee: अभिनेत्री डेबिना दुसऱ्यांदा गरोदर;  चार महिन्यांपूर्वीच दिला मुलीला जन्म
Debina Bonnerjee: अभिनेत्री डेबिना दुसऱ्यांदा गरोदरImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 16, 2022 | 1:42 PM
Share

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध जोडी डेबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आणि गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. डेबिनाने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत दुसऱ्यांदा गरोदर (pregnancy) असल्याचं जाहीर केलं आहे. चार महिन्यांपूर्वीच डेबिनाने मुलगी लियानाला जन्म दिला होता. इन्स्टाग्रामवर तिने गुरमीत, लियानासोबत हातात सोनाग्राफीचा फोटो दाखवत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. ‘काही निर्णयांची वेळ ही ठरलेली असते आणि त्याला कोणीच बदलू शकत नाही. हासुद्धा असाच एक आशीर्वाद आहे. आमच्या कुटुंबात आणखी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे. यासोबतच ‘बेबी नंबर 2’, ‘मॉमी अगेन’, ‘प्रेग्नंसी डायरीज’ असे हॅशटॅग तिने दिले आहेत.

डेबिनाच्या या फोटोवर कमेंट करत अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘ओह माय गॉड, खूप खूप शुभेच्छा’ असं तन्मवी ठक्करने लिहिलंय. तर ‘वॉव, तुम्हा दोघांना शुभेच्छा’ अशी कमेंट रश्मी देसाईने लिहिली. यासोबतच टिना दत्ता, युविका चौधरी यांसह इतरही सेलिब्रिटींनी डेबिना आणि गुरमीतला शुभेच्छा दिल्या आहेत.

4 एप्रिल रोजी डेबिना आणि गुरमीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत मुलीच्या जन्माची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. लियाना तीन महिन्यांची झाल्यानंतर तिचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. डेबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी हे टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. गुरमीत आणि डेबिनाने ‘रामायण’ या मालिकेत एकत्र काम करून लोकप्रियता मिळवली. 2008 मध्ये प्रसारित झालेल्या या मालिकेने दोघांनाही प्रेक्षकांची पसंती मिळवून दिली. याच मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. 2011 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.

Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल