Murder | या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची मुंबईत हत्या, मुलानेच घेतला आईचा जीव

| Updated on: Dec 09, 2022 | 8:22 PM

जुहूमध्ये एका 74 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली

Murder | या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची मुंबईत हत्या, मुलानेच घेतला आईचा जीव
Follow us on

मुंबई : जुहूमध्ये एका 74 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. मात्र, ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वीणा कपूर आहेत. इतकेच नाही तर या हत्येप्रकरणात पोलिसांनी वीणा कपूर यांचा मुलगा आणि त्याच्या साथीदाराला अटक केलीये. वीणा कपूर यांच्या हत्येची बातमी ऐकताच सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. वीणा कपूर यांच्याच मुलाने ही हत्या केलीये. जुहू पोलिसांनी या हत्येप्रकरणी गुन्हा नोंद करत वीणा कपूर यांचा मुलगा सचिन कपूर आणि त्याचा साथीदार लालूकुमार मंडल यांना अटक केलीये.

मेरी भाभी या मालिकेसोबतच त्यांनी अनेक मालिकांमध्ये दमदार अभिनय केले होते. मेरी भाभी या मालिकेमध्ये वीणा कपूर यांच्यासोबत काम केलेल्या नीलू कोहली यांनी पापाराझी व्हायरल भयानी यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर वीणा कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Tv9 भारतवर्षसोबत बोलताना नीलू कोहली म्हणाल्या की, मी वीणा यांच्यासोबत मेरी भाभी या मालिकेमध्ये तब्बल 5 वर्ष सोबत काम केले आहे. इतकेच नाहीतर या मालिकेनंतरही आम्ही अजून एक मालिका देखील सोबत केलीये.

पुढे नीलू कोहली म्हणाल्या, कोरोनाच्या काळाच्या अगोदरच आमचा संपर्क तुटला आणि त्यानंतर मी माझ्या काही प्रोजेक्टमध्ये बिझी झाले. मला अजूनही विश्वास बसत नाहीये की, त्या आज आपल्यासोबत नाहीयेत याचा…

एक पोस्ट शेअर करत नीलू कोहली यांनी लिहिले की, आज माझा दिल तुटला आहे. तुमच्याबद्दल लिहिण्यासाठी माझ्याकडे काही शब्दच नाहीयेत. इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर आज तुम्हाला शांती मिळाली असेल…

नीलू कोहली यांच्या पोस्टवर कमेंट करत श्याम माहेश्वरी यांनी लिहिले की, ओह माय गॉड…मी ही बातमी पेपरमध्ये वाचली होती आणि माझ्या मनामध्ये वीणा कपूर यांचाच विचार आला होता. मी यांच्यासोबत मेरी भाभी मालिकेत काम केले होते.

श्याम माहेश्वरी यांनी पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, थोडे थांबा यार…जगाला इतके पण वाईट नका बनू…सचिन कपूर आणि वीणा कपूर यांच्या संपत्तीचा वाद असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी सचिन कपूर याच्याविरोधात कलम 302, 201 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.