Bigg Boss 16 | टीना दत्ताने शालीन आणि सुंबुलच्या नात्याबद्दल विचारला मोठा प्रश्न?

बिग बाॅस सीजन 16 मध्ये शालीन आणि सुंबुल अर्थात इमलीचा लव्ह अॅगल पुढे येतंय. प्रेक्षकांमध्ये देखील याची चर्चा असतानाच घरातील एका सदस्याने याबद्दल थेट शालीनला विचारणा केली.

Bigg Boss 16 | टीना दत्ताने शालीन आणि सुंबुलच्या नात्याबद्दल विचारला मोठा प्रश्न?
| Updated on: Oct 06, 2022 | 8:02 AM

मुंबई : कलर्स टीव्हीचा रिअॅलिटी शो बिग बाॅस (Bigg Boss) सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बाॅस सीजन 15 पेक्षा हे सीजन अधिक खास होणार हे दिसतंय. कारण बिग बाॅस 15 चा टीआरपी वाढत नव्हता. बिग बाॅसचे 15 वे सीजन (Season) जवळपास फेल गेले होते. यामुळे यंदा बिग बाॅसच्या निर्मात्यांनी सुरूवातीपासूनच सावधान भूमिका घेत प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी कंबर कसलीये. बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) ला सुरू होऊन अवघे काही दिवस झाले असताना बिग बाॅस सीजन 16 मध्ये लव्ह अॅगल पुढे येतोय.

बिग बाॅस सीजन 16 मध्ये शालीन आणि सुंबुल अर्थात इमलीचा लव्ह अॅगल पुढे येतोय. प्रेक्षकांमध्ये देखील याची चर्चा असतानाच घरातील एका सदस्याने याबद्दल थेट शालीनला विचारणा केली. टीना दत्ता थेट शालीनला सुंबुल आणि त्याच्या रिलेशनबद्दल विचारते. टीना म्हणते की, मला पाठीमागे बोलायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी तुला थेट विचारते बाकीचे लोक माघारी याबाबत चर्चा करत आहेत.

टीना शालीनला म्हणते की, तुझ्यामध्ये आणि सुंबुलमध्ये नेमके काय सुरू आहे. कारण अनेकजण काहीतरी वेगळीच चर्चा करत आहेत. तु सुंबुलवर प्रेम करतोस का? यावर शालीन टीनाला म्हणतो की, यार…ती लहान मुलगी आहे. मी तिच्याबद्दल अजिबात असा विचार करत नाही. तिचे वय एकदम लहान आहे. काही गॉसिप वगैरे सुरू असेल तर मला काही माहिती नाहीये. पण माझ्यामध्ये आणि सुंबुलमध्ये नक्कीच असे काहीही नाहीये.