Raju Srivastav | राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीमध्ये मोठी सुधारणा, वाचा नवीन हेल्थ अपडेट…

विशेष म्हणजे राजू श्रीवास्तव यांचे हृदयाचे ठोके, बीपी आणि ऑक्सिजनची पातळी सामान्य असल्याचे देखील डाॅक्टरांचे म्हणणे आहे आणि यामुळे राजू यांना व्हेंटिलेटरवरून काढले जाणार आहे. यापूर्वी दोन वेळा राजू यांचे व्हेंटिलेटर काही वेळेसाठी काढण्यात आले होते, मात्र काही वेळाने त्याला पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.

Raju Srivastav | राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीमध्ये मोठी सुधारणा, वाचा नवीन हेल्थ अपडेट...
Raju Srivastava
| Edited By: | Updated on: Sep 01, 2022 | 9:02 AM

मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) गेल्या 22 दिवसांपासून रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या 22 दिवसांमध्ये त्यांच्या तब्येतीविषयी नवनवीन अपडेट पुढे आले. राजू यांच्या तब्येतीमध्ये सातत्याने चढ-उतार बघायला मिळतोयं. काही दिवसांपूर्वी राजू हे शुद्धीवर आल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या सर्वत्र पसरल्या होत्या. त्यानंतर त्यांची तब्येत (Health) स्थिर असल्याची देखील बातमी आली होती. मात्र, नुकताच राजू श्रीवास्तव यांच्या बंधुंनी राजूंच्या तब्येतीबद्दल नवीन अपडेट (Update) शेअर केलीयं. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही बातमी राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांसोबतच चाहत्यासाठी अत्यंत आनंदाची आहे.

बीपी आणि ऑक्सिजनची पातळी सामान्य

विशेष म्हणजे राजू श्रीवास्तव यांचे हृदयाचे ठोके, बीपी आणि ऑक्सिजनची पातळी सामान्य असल्याचे देखील डाॅक्टरांचे म्हणणे आहे आणि यामुळे राजू यांना व्हेंटिलेटरवरून काढले जाणार आहे. यापूर्वी दोन वेळा राजू यांचे व्हेंटिलेटर काही वेळेसाठी काढण्यात आले होते, मात्र काही वेळाने त्याला पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण एक चांगली गोष्ट म्हणजे राजू श्रीवास्तव आता 90 टक्के ऑक्सिजन नैसर्गिकरित्या घेऊ शकत आहेत. यामुळे डॉक्टर व्हेंटिलेटर काढण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

राजू श्रीवास्तव हे 10 ऑगस्टपासून व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा पाहून मंगळवारी डॉक्टरांनी त्यांचा व्हेंटिलेटरचा आधार काही काळ काढून घेतला. 14 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना ताप आला होता, मात्र 3 दिवसांनी कमी झाला. त्यानंतरच राजूच्या मेंदूला संसर्ग झाल्याचे आढळून आले, यामुळे परत एकदा चिंता वाढली. मात्र, आता राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीमध्ये मोठी सुधारणा झाल्याचे दिसते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजू यांचे चाहते त्यांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत.