TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेला सोडचिठ्ठी देणार जेठालाल उर्फ दिलीप जोशी?

सोनी सब (Sony SAB) टीव्हीवरचा 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) 13 वर्षांपूर्वी ऑन एअर झाला होता आणि तो आजही लोकांचं मनोरंजन करत आहे. शोचा प्राण म्हणजेच जेठालाल उर्फ ​​दिलीप जोशी (Dilip Joshi) या शोला अलविदा करणार आहेत, अशी चर्चा आहे.

TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेला सोडचिठ्ठी देणार जेठालाल उर्फ दिलीप जोशी?
Jethalal
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 3:24 PM

मुंबई : सोनी सब (Sony SAB) टीव्हीवर प्रसारित झालेला सिटकॉम ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) 13 वर्षांपूर्वी ऑन एअर झाला होता आणि तो आजही लोकांचं मनोरंजन करत आहे. या शोसोबतच त्यातल्या पात्रांनीही जगभरात लोकप्रियता मिळवलीय. अनेक कलाकारांनी या शोला निरोप दिला आणि अनेक नवीन चेहरे या शोमध्ये सामील झाले. आता एक बातमी समोर आलीय, की या शोचा प्राण म्हणजेच जेठालाल उर्फ ​​दिलीप जोशी (Dilip Joshi) या शोला अलविदा करणार आहेत. त्यांनी दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलंय.

‘ऑफर्स येतात, पण…’
दिलीप जोशी म्हणाले, की माझा शो हा एक कॉमेडी शो आहे आणि त्याचा एक भाग होण्यात मजा आहे, त्यामुळे जोपर्यंत मी त्याचा आनंद घेत आहे तोपर्यंत मी तो करत राहीन. ज्या दिवशी मला वाटेल, की मी आता त्याचा आनंद घेत नाही, तेव्हा मी पुढे जाईन. मला इतर शोच्या ऑफर्स येतात, पण मला वाटतं, की हा शो चांगला चालतोय तेव्हा विनाकारण कशाला सोडून द्यावा? हा एक सुंदर प्रवास आहे आणि मी त्यात आनंदी आहे. लोक आपल्यावर खूप प्रेम करतात आणि मी ते विनाकारण वाया घालवायचं का?

‘नव्या सिनेमांचा विचार करीन’
दिलीप जोशी यांनी चित्रपटांमध्येही काम केलंय. त्यातही त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. आजकाल तयार होत असलेल्या चित्रपटांबाबत दिलीप जोशी म्हणाले, की मला अभिनयाच्या बाबतीत अजून खूप काही करायचं आहे. आजच्या सिनेमांत विविध प्रकारचे विषय येतात. त्यामुळे एखाद्या चांगल्या चित्रपटात भूमिका साकारण्यास मी कधीच मागं हटणार नाही. सध्या मी माझ्या आयुष्यात जे घडत आहे त्याचा आनंद घेत आहे.

Nora Fatehi | बॉलिवूडवर कोरोनाचा कहर! ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीलाही कोरोना विषाणूची लागण!

Pushpa | ‘पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनची रेकॉर्ड ब्रेक कमाई, ‘केजीएफ 1’लाही टाकलं मागे! पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन…

RRR Movie Release | ओमिक्रॉन-कोरोनाचं संकट तरीही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार ‘RRR’, निर्मात्यांचा मोठा निर्णय!