Pushpa | ‘पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनची रेकॉर्ड ब्रेक कमाई, ‘केजीएफ 1’लाही टाकलं मागे! पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन…

'स्पायडरमॅन : नो वे होम' या हॉलिवूड चित्रपटासह प्रदर्शित झालेला चित्रपट 'पुष्पा' (Pushpa The Rise)  सध्या जोरात सुरू आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने उत्कृष्ट बॉक्स ऑफिस कलेक्शनने सर्व ट्रेड विश्लेषकांना आश्चर्यचकित केले आहे.

Pushpa | ‘पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनची रेकॉर्ड ब्रेक कमाई, ‘केजीएफ 1’लाही टाकलं मागे! पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन...
पुष्पा : द राइज
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 2:13 PM

मुंबई : ‘स्पायडरमॅन : नो वे होम’ या हॉलिवूड चित्रपटासह प्रदर्शित झालेला चित्रपट ‘पुष्पा’ (Pushpa The Rise)  सध्या जोरात सुरू आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने उत्कृष्ट बॉक्स ऑफिस कलेक्शनने सर्व ट्रेड विश्लेषकांना आश्चर्यचकित केले आहे. आणि या चित्रपटाने असा विक्रम केला आहे, जो ऐकून अल्लूच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही.

अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा’ या चित्रपटाला देशभरातील प्रेक्षक पसंती देत ​​आहेत. तमिळ, तेलगू या साऊथच्या चित्रपटांची क्रेझ आणि लोकप्रियता प्रचंड आहे. पण, हिंदी सिनेविश्वातही साऊथच्या चित्रपटांनाही मोठा प्रेक्षकवर्ग आहे आणि हे आता सिद्ध झाले आहे. किंबहुना, तेलुगु चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालणारा अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही आपली ताकद दाखवत आहे.

KGF 1 ला टाकले मागे!

चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे आणि अल्लू अर्जुनचे स्टारडम सिद्ध केले आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट कोमल नाहता यांनी ट्विटरवर माहिती शेअर करताना सांगितले आहे की, कमाईच्या बाबतीत ‘पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनने इतर दक्षिण हिंदी डब चित्रपटांना मागे टाकले आहे. तर आतापर्यंत KGF हिंदी या यादीत आघाडीवर होता.

गेल्या तीन वर्षांत हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या दक्षिण भारतीय चित्रपटांबद्दल बोलायचे तर, 2018 मध्ये आलेल्या कन्नड चित्रपट ‘KGF चॅप्टर 1’ बद्दल सर्वात जास्त चर्चा झाली. परंतु, पुष्पाने KGF चॅप्टर 1ला देखील मागे टाकले आहे. ‘पुष्पा’ हिंदीने 13 दिवसांत 45.5 कमाई केली असून, आता अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने पहिल्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे.

हिंदी चित्रपटप्रेमींनी आवडला ‘पुष्पा’

खरंच, ‘पुष्पा द राइज’ बॉलिवूडसाठी एक सरप्राईज म्हणून आला आहे. क्वचितच कोणीही अपेक्षा केली असेल की मोठ्या जाहिरातीशिवाय, पुष्पा हिंदी भाषिक लोकांमध्ये इतकी लोकप्रियता मिळवेल. अल्लू अर्जुनचा हा पहिला चित्रपट आहे, जो हिंदी तसेच तेलुगुमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदर्शित झाला होता. 17 डिसेंबरला पुष्पा तेलुगूसह हिंदी भाषेतही रिलीज झाला. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी हिंदीत 3 कोटींचा व्यवसाय केला.

चित्रपटाची कथा पुष्पा राजची (अल्लू अर्जुन) आहे, जो लाल चंदनाच्या लाकडाची तस्करी करण्याच्या व्यवसायात प्रवेश करतो. अल्लू अर्जुनशिवाय रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.

हेही वाचा :

RRR Movie Release | ओमिक्रॉन-कोरोनाचं संकट तरीही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार ‘RRR’, निर्मात्यांचा मोठा निर्णय!

Shilpa Shirodkar | सगळ्यात पहिली ‘लसवंत’ अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह! शिल्पा शिरोडकर विषाणूच्या विळख्यात!

अभिनेत्री पूजा सावंत, चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव पुरस्कार; मंत्री जयंत पाटलांच्या हस्ते नाशिकमध्ये होणार सन्मान

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.