Kamya Punjabi: पाणीपुरीने आणलं काम्या पंजाबीच्या डोळ्यात पाणी; स्टॉलवरच विसरली एक लाख रुपयांचं पाकिट

| Updated on: Jun 01, 2022 | 12:28 PM

खरंतर पाणीपुरी सर्वांच्या जिभेचे चोचले पुरवते. पण काम्यासाठी ही पाणीपुरी अक्षरश: डोळ्यात पाणी आणणारी ठरली आहे. तर झालं असं की, काम्याला इंदौरमध्ये (Indore) एका स्टॉलवरील पाणीपुरी खायची इच्छा झाली. तिने स्वत:ची ती इच्छा पूर्ण तर केलीच, पण एक लाख रुपयांच्या किंमतीवर.

Kamya Punjabi: पाणीपुरीने आणलं काम्या पंजाबीच्या डोळ्यात पाणी; स्टॉलवरच विसरली एक लाख रुपयांचं पाकिट
Kamya Punjabi
Image Credit source: Instagram
Follow us on

पाणीपुरी.. जीभेला पाणी सुटायला हा एकच शब्द पुरेसा आहे. पाणीपुरी आवडत नाही, अशी व्यक्ती क्वचितच तुम्हाला भेटेल. सर्वसामान्यांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी आतूर असतात. अगदी डाएट फ्रीक कलाकारसुद्धा पाणीपुरीसाठी (pani puri) सर्वकाही विसरून जातात. असाच काहीसा किस्सा प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबीसोबत (Kamya Punjabi) घडला आहे. खरंतर पाणीपुरी सर्वांच्या जिभेचे चोचले पुरवते. पण काम्यासाठी ही पाणीपुरी अक्षरश: डोळ्यात पाणी आणणारी ठरली आहे. तर झालं असं की, काम्याला इंदौरमध्ये (Indore) एका स्टॉलवरील पाणीपुरी खायची इच्छा झाली. तिने स्वत:ची ती इच्छा पूर्ण तर केलीच, पण एक लाख रुपयांच्या किंमतीवर. तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला ना? स्टॉलवर पाणीपुरी खाण्यात ती इतकी मग्न झाली होती, की तिच्या हातात असलेलं पाकिट ती तिथेच विसरून गेली. त्या पाकिटात एक लाख रुपये होते. एका मुलाखतीत खुद्द काम्यानेच हा किस्सा सांगितला.

एका कार्यक्रमानिमित्त काम्या इंदौरला गेली होती. तिथून परत येताना मित्राच्या आग्रहाखातर ती एका स्टॉलवर पाणीपुरीचा आनंद घेण्यासाठी थांबली. नंतर हॉटेलमध्ये आल्यावर तिला समजलं की आपण आपल्या हातातील एक लाख रुपयांचं पाकिट हे स्टॉलवरच विसरून आलो आहोत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना काम्याने सांगितलं, “रविवारी मी इंदौरला एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. तिथे छप्पन दुकान या नावाच्या स्टॉलवर अत्यंत चविष्ट पाणीपुरी मिळत असल्याचं माझ्या मित्राने सांगितलं. इंदौर चाटसाठी खूप प्रसिद्ध आहे. मीसुद्धा स्वत:ला कंट्रोल करू शकले नाही आणि आम्ही ती पाणीपुरी खायला गेलो. माझ्या हातात एक पाकिट होतं आणि त्यात कॅश होती. पाणीपुरी खाताना मी तिथल्या टेबलवर ते पाकिट ठेवलं. त्यानंतर मी खाण्यात आणि तिथले फोटो काढण्यात इतकी मग्न झाली की ते पाकिट तिथून घेण्यास विसरली. नंतर आम्हाला जेव्हा समजलं तेव्हा माझा मित्र त्या दुकानावर परत गेला. सुदैवाने ते पाकिट मी ज्याठिकाणी विसरले होते, तिथेच ते परत सापडलं आणि त्यातले पैसेुसद्धा तसेच होते. त्याने त्या पाणीपुरीवाल्याचे आभारही मानले.”

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

काम्या नुकतीच ‘शक्ती- अस्तित्व के एहसास की’ या मालिकेत झळकली. आतापर्यंत तिने रेत, अस्तित्व की प्रेम कहानी, बन्नो मे तेरी दुल्हन, पिया का घर, मर्यादा- लेकीन कब तर, क्यू होता है प्यार यांसारख्या मालिकेत काम केलं. कॉमेडी सर्कसच्या दुसऱ्या सिझनमध्ये आणि बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्येही ती सहभागी झाली होती.