AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कौन बनेगा करोडपतीपेक्षाही अनेरी आर्याला हे महत्त्वाचे, ऑडिशन नाकारल्याचे कारण सांगितले…

अनेरी आर्या वय 26 ही गुजरातमधून आली होती आणि हॉट सीट बसण्याची सुवर्णसंधी अनेरीला मिळाली होती. सुरतमधील एका महाविद्यालयात अनेरी ही प्राध्यापक आहे. अनेरीला जन्मापासूनच नीट दिसत नसून जन्माच्या वेळी तिला काचबिंदू झाला होता.

कौन बनेगा करोडपतीपेक्षाही अनेरी आर्याला हे महत्त्वाचे, ऑडिशन नाकारल्याचे कारण सांगितले...
| Edited By: | Updated on: Sep 13, 2022 | 12:02 PM
Share

मुंबई : बिग बी यांच्या कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) शोमध्ये येण्याचे आणि अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. में अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) कौन बनेगा करोडपती मैं आपका स्वागत करता हूँ…हे शब्द कानावर पडल्यावर एक वेगळीच एनर्जी मिळते. आता कौन बनेगा करोडपतीचे 14 वे सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोमवारी कौन बनेगा करोडपतीच्या 14 व्या सीजनमध्ये हॉट सीटवर गुजरातमधील (Gujarat) सूरत येथून आलेली अनेरी आर्या होती. अनेरी आर्याने कशाप्रकारे जीवनामध्ये संघर्ष केलायं, हे सांगण्यात आले.

अनेरी आर्याने बिग बीला सांगितले हे महत्वाचे कारण

अनेरी आर्या वय 26 ही गुजरातमधून आली होती आणि हॉट सीटवर बसण्याची सुवर्णसंधी अनेरीला मिळाली होती. सुरतमधील एका महाविद्यालयात अनेरी ही प्राध्यापक आहे. अनेरीला जन्मापासूनच नीट दिसत नसून जन्माच्या वेळी तिला काचबिंदू झाला होता. एका ऑनलाइन पोर्टलशी बोलताना अनेरीने सांगितले की, कौन बनेगा करोडपतीमध्ये मी आलीयं, हे एखाद्या स्वप्नासारखेच वाटत आहे.

सेलिब्रेटी झाल्यासारखे वाटू लागले…

अनेरी बोलताना म्हणाली की, मी कौन बनेगा करोडपतीमध्ये आल्यापासून मला एखाद्या सेलिब्रेटीसारखे वाटत आहे. कारण मला सतत नातेवाईक आणि मित्रांचे काॅल येत आहेत. विशेष म्हणजे या अगोदरही अनेरीची कौन बनेगा करोडपतीमध्ये निवड झाली होती. मात्र, ज्यादिवशी केबीसीमध्ये तिचे ऑडिशन होते, त्याचदिवशी नोकरीसाठी तिची मुलाखत असल्याने त्यावेळी अनेरी ऑडिशनसाठी येऊ शकली नव्हती. अनेरीने सांगितले की, मला मी कौन बनेगा करोडपतीपेक्षाही नोकरी महत्वाची होती.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.