KBC 13 | ‘कौन बनेगा करोडपती 13’ला मिळणार का पुढचा करोडपती विजेता? स्पर्धक देऊ शकेल 7 कोटीच्या प्रश्नाचं उत्तर?

| Updated on: Oct 16, 2021 | 6:52 PM

प्रत्येक वेळी प्रमाणे ‘कौन बनेगा करोडपती 13’ (KBC 13) यावेळी देखील बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन होस्टिंग करताना दिसत आहेत. दरवेळी प्रमाणे या वेळीही अनेक स्पर्धक हॉटसीटवर बसून नशीब आजमावताना दिसत आहेत.

KBC 13 | ‘कौन बनेगा करोडपती 13’ला मिळणार का पुढचा करोडपती विजेता? स्पर्धक देऊ शकेल 7 कोटीच्या प्रश्नाचं उत्तर?
KBC 13
Follow us on

मुंबई : प्रत्येक वेळी प्रमाणे ‘कौन बनेगा करोडपती 13’ (KBC 13) यावेळी देखील बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन होस्टिंग करताना दिसत आहेत. दरवेळी प्रमाणे या वेळीही अनेक स्पर्धक हॉटसीटवर बसून नशीब आजमावताना दिसत आहेत. आता अलीकडेच शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते की केबीसी 13मध्ये आणखी एक स्पर्धक करोडपती होणार आहे.

या शोच्या एक नव्या प्रोमोमध्ये त्यांना या हंगामातील त्यांचा दुसरा करोडपती मिळणार आहे. आता शोमध्ये आणखी एक स्पर्धक करोडपती होणार आहे, मात्र शोच्या प्रोमोमध्ये या स्पर्धकाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

7 कोटींच्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊ शकेल का स्पर्धक?

अलीकडेच, सोनी टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या या प्रोमोवरून हे स्पष्ट झाले आहे की, हा स्पर्धक 14व्या प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन एक कोटी कमवणार आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला, होस्ट अमिताभ बच्चन आणि स्पर्धकांमधील संभाषण कसे घडते, ते आपण पाहू शकतो.

कोणते उत्तर बरोबर आहे हे शोधण्याचा प्रयत्न करताना अमिताभ स्पर्धकाला प्रश्नाचे सर्व पर्याय स्पष्ट करतात. स्पर्धक ‘ऑप्शन डी’ निवडतो, त्यानंतर अमिताभ त्याच्या नेहमीच्या शैलीत ‘एक कोटी’ म्हणतात, स्पर्धकाला कळू देतात की, त्याने या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे. यावेळी स्पर्धकाच्या उत्साहाला पारावर राहत नाही, कारण त्याने तब्बल कोटींच बक्षीस जिंकलं आहे.

येथे पहा व्हिडीओ

अमिताभ मात्र त्यांना आठवण करून देतात की, खेळ अजून संपलेला नाही. मग ते 7 कोटी जॅकपॉट प्रश्नाकडे वळतात. आता प्रत्येकाच्या नजरा हा स्पर्धक 7 कोटींच्या प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन या सीझनमध्ये 7 कोटी जिंकणारा पहिला स्पर्धक ठरतो की नाही यावर लक्ष लागले आहे.

KBC 13च्या या हंगामात फक्त आग्राच्या हिमानी बुंदेला यांनी शोमधून 1 कोटी रुपये जिंकले होते. डोळ्यांनी कमकुवत असलेल्या हिमानीचा 2011 मध्ये अपघात झाला, त्यानंतर कालांतराने तिची दृष्टी गेली. हिमानी यांनी सांगितले की, त्या लहान असल्यापासून त्यांच्या मित्र-मैत्रीणींना एकत्र करून केबीसीचा खेळ खेळायची. त्यामुळे त्यांचे सामान्य ज्ञान खूप चांगले झाले. हिमानी म्हणाल्या की, जेव्हा त्या ‘फास्टेस्ट फिंगर’च्या उत्तराची वाट पाहत होत्या, तेव्हा आपण अपंग असल्याने त्या खूप घाबरल्या होत्या. यानंतर त्यांनी आपले धैर्य एकवटले आणि विचार केला की, त्या येथे स्वतःच्या कुटुंबाचा आणि अपंग समाजाचा अभिमान आणखी वाढवण्यासाठी आल्या आहेत. हिमानी बुंदेला यांनी शोमध्ये मिळालेल्या पैशांचा वापर करून एक कोचिंग क्लास उघडण्यासाठी करण्याची योजना बनवली आहे, जिथे अपंग आणि सामान्य मुले एकत्र अभ्यास करू शकतील.

हेही वाचा :

अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’चं शूटिंग पुन्हा सुरू, जॅकलिन फर्नांडिसने सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो

करीनाने शेअर केला ग्रीसमधील एक जुना फोटो, सैफला खास अंदाजात दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा