‘मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’, केतकी चितळे महापालिका कर्मचाऱ्याला उद्देशून काय म्हणाली?

अभिनेत्री केतकी चितळे हिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ती महापालिका कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारताना दिसत आहे. संबंधित कर्मचारी हे जातजनगणना करत असल्याचं निदर्शनास येत आहे. यावेळी केतकी कर्मचाऱ्याला प्रश्न विचारते.

'मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण', केतकी चितळे महापालिका कर्मचाऱ्याला उद्देशून काय म्हणाली?
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 11:36 AM

मुंबई | 26 जानेवारी 2024 : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील लाखो मराठा आंदोलकांचा मोर्चा घेऊन वाशी येथे पोहोचले आहेत. ते कदाचित उद्या मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचू शकतात. सरकार त्यांची मनधरणी करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते देखील आक्रमक झाले आहेत. मराठ्यांना सरसकट ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं तर आंदोलन करु, असा इशारा ओबीसी समाजाकडून देण्यात आला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ केतकी चितळे जातीय सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रश्न विचारताना दिसत आहे. प्रजासत्ताक दिनी जात विचारली जात असल्याचं केतकी चितळे म्हणाली आहे. जाती भेदाचे कायदे केले जात आहेत, असं केतकी म्हणाली आहे. केतकी चितळेकडून सर्वेक्षणाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता. पण तो व्हिडीओ काढून टाकण्यात आल्याची शक्यता आहे.

केतकी चितळे नेमकं काय म्हणते?

“तुम्ही महापालिकेतून आल्या आहेत ना? तुम्ही सर्वांना जात विचारत आहात, आरक्षण की ओपन म्हणून, का?”, असा प्रश्न केतकी संबंधित महिला कर्मचाऱ्याला विचारते. त्यावर सर्व्हे करणारी महिला मराठा आरक्षणासाठी सर्व्हे चालू आहे, असं स्पष्टीकरण देते. त्यावर केतकी बोलायला लागते. “आरक्षण भेटण्यासाठी सर्व्हे सुरु आहे. आज गणतंत्र दिवस आहे. तुम्हीपण मराठा म्हणजे माझ्यावर अॅट्रोसिटी टाकणार नाहीत, धन्यवाद मॅडम!”, असं केतकी व्हिडीओ बोलताना दिसत आहे.

यानंतर संबंधित कर्मचारी तुमची जात मराठा आहे का? असा प्रश्न विचारते. त्यावर केतकी अजिबात नाही. “चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण”, असं उत्तर केतकी देते. “आज रिपल्बिक डे आहे आणि आरक्षणासाठी लोकं प्रश्न विचारत आहेत. महापालिकेकडून लोकं प्रश्न विचारायला येत आहेत. इन द सेन्स, संविधान सर्वांसाठी समान नाही. सर्वांसाठी सर्व कायदा एक नाहीत. ते आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुरु आहे. तुम्ही का विचार करता? प्रत्येकासाठी आपला कायदा समान आहे की जातीनुसार वेगवेगळे कायदे, नियम बनवले जात आहेत?”, असा सवाल केतकी या व्हिडीओत करताना दिसत आहे.

Non Stop LIVE Update
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.