एमसी स्टॅन याने केला सानिया मिर्झा हिच्या शेवटच्या सामन्यात परफॉर्म, रॅपर दिसताच चाहत्यांनी…

एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाल्यापासून त्याची फॅन फाॅलोइंग चांगलीच वाढली आहे. नुकताच सोशल मीडियावर एमसी स्टॅन आणि सानिया मिर्झा यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

एमसी स्टॅन याने केला सानिया मिर्झा हिच्या शेवटच्या सामन्यात परफॉर्म, रॅपर दिसताच चाहत्यांनी...
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 05, 2023 | 4:05 PM

मुंबई : बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन हा अनेक रेकाॅर्ड तोडताना दिसत आहे. बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मधून बाहेर आल्यानंतर एमसी स्टॅन याची फॅन फााॅलोइंग देखील वाढलीये. एमसी स्टॅन हा सतत चर्चेत आहे. काही दिवसांपासून आपण भारत दाैरा करत असल्याचे एमसी स्टॅन (MC Stan) याने जाहिर केल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत होता. बिग बॉस 16 मधून बाहेर आल्यावर एमसी स्टॅन याला विचारण्यात आले की, बिग बॉस 16 मधील कोणत्या सदस्यांच्या संपर्कात राहण्यास तुला आवडेल? यावर एमसी स्टॅन हा अत्यंत बिनधास्त बोलताना दिसला आणि तो म्हणाला की, मला फक्त मंडळीच्या संपर्कात राहिला आवडेल आणि मी फक्त त्यांच्याच संपर्कात राहणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत एमसी स्टॅन याच्या चाहत्यांची संख्या वाढताना दिसत आहे. नुकताच सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसले. या फोटो आणि व्हिडीओमध्ये एमसी स्टॅन आणि सानिया मिर्झा हे दिसत आहेत. आता फोटोंवर चाहते कमेंट करताना दिसले.

आज 5 मार्च 2023 रोजी हैद्राबादमध्ये सानिया मिर्झा हिचा शेवटचा टेनिस मॅच होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सानिया मिर्झा हिने रिटायरमेंट घेतले आहे. आज सानियाचा फेयरवेल मॅच पार पडणार आहे. या मॅच अगोदर एमसी स्टॅन याचा लाइव्ह परफॉर्म देखील झालाय. मॅचच्या अगोदर सानिया मिर्झा ही एमसी स्टॅन याची गळाभेट घेताना देखील दिसली आहे.

एमसी स्टॅन आणि सानिया मिर्झा यांच्यामध्ये काही काळ चर्चा देखील झालीये. फराह खान आणि सानिया मिर्झा या खूप चांगल्या मैत्रिनी आहेत. बिग बॉस 16 मध्ये फॅमिली विकमध्ये आल्यावर फराह खान ही शिव ठाकरे याला म्हणाली होती की, एक भाऊ बिग बॉस 16 मध्ये सोडून गेले होते आणि आता मला तीन भाऊ मिळाले आहेत. फराह खान हिच्यासोबत एक खास रिलेशन एमसी स्टॅन याचे आहे.

एमसी स्टॅन याचा बिग बाॅसच्या घरात काही खास गेम नव्हता. मात्र, त्याचा चाहता वर्ग अत्यंत मोठा असल्याने तो बिग बाॅस 16 चा विजेता झालाय. बिग बॉस 16 च्या घरात एमसी स्टॅन, शिव ठाकरे, साजिद खान, अब्दू रोजिक, निम्रत काैर आणि सुंबुल ताैकीर यांच्यामध्ये खास मैत्री बघायला मिळाली. प्रियंका चाैधरी किंवा शिव ठाकरे यांच्यापैकी एकजण बिग बॉस 16 चा विजेता होईल, असे सर्वांना वाटत होते.