पुढारी कसे न लाजता मत मागतात, तसंच काहीसं…; अभिनेते मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत

Aai Kuthe Kay Karte Actor Milind Gawali on Maharashtra Politics : 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी यांची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहे. मिलिंद गवळी यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय? राजकारणावर मिलिंद गवळी काय म्हणाले? वाचा सविस्तर...

पुढारी कसे न लाजता मत मागतात, तसंच काहीसं...; अभिनेते मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
Follow us
| Updated on: May 19, 2024 | 8:04 PM

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरूद्ध… अर्थात अभिनेते मिलिंद गवळी… मिलिंद गवळी हे विविध विषयांवर आपलं मत मांडताना दिसतात. त्यांच्या इन्स्टाग्रामवरच्या पोस्ट अगदी मार्मिक असतात. दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयावर ते बोलत असतात. आताही त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी राजकीय मुद्द्यालाही स्पर्श केला आहे. बोलणं, व्यक्त होणं, यावर मिलिंद गवळी यांनी भाष्य केलं आहे. ‘पुढारी कसे न लाजता मत मागतात, तसंच काहीसं…’ असं मिलिंद गवळी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मिलिंद गवळी यांची पोस्ट जशीच्या तशी

बोलणाऱ्याची माती पण विकली जाते, आणि न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकले जात नाहीत. आणि कदाचित ते खरंही आहे कारण रडक्या हट्टी मुलांना जास्त chocolates मिळतात.

बरेच वेळेला समोरचा माणूस समजून घेयील असं वाटतं ,पण समोरच्या माणसाला काही कळतच नाही, जेव्हा आपण त्या समोरच्या माणसाला सांगतो की तू माझा विचारच केला नाहीस, मग तो म्हणतो अरे मला बोलायचं ना, मला काय माहित, मला काय स्वप्न पडलं होतं का, माझ्या बाबतीत एक गोष्ट नेहमी घडायची, माझ्या आईची खूप आग्रह करून जेवायला वाड्याची सवय होती , दोन पोळ्या खाणाऱ्या माणसाला ती पाच सहा पोळ्या नक्कीच खाऊ घालायची, समोरचा माणूस कितीही नाही म्हटला तरी ती वाढायची, आता मला ती सवय होती, आता माझ्या आईचं बघून बाकीच्यांना पण ही सवय लागली होती त्यामुळे ते सुद्धा आग्रह करायला लागले होते.

त्यामुळे मला एक सवय होती की आपण स्वतःहून कधी मागायचं नाही,आपल्याला आग्रह केला तरच मग आपण खायचं. पण काही घरांमध्ये प्रत्येक जण आपापलं वाढून घ्यायचा, कोणी कोणाला आग्रह करायचं नाही, ज्या ला जेवढं वाटेल तेवढं त्यांनी स्वतःहून खायचा, बर अशा ठिकाणी मी काय उपाशीच रायचो , कारण मला मागून खायची सवयच नव्हती.

सुरुवातीला कॅम्पस सिरीयलच्या वेळेला, ही सगळी पोरं, जेवणावर अक्षरशः तुटून पडायची, पण मग स्वतःहून वाढून घ्यायचं नाही म्हणून मी दिवस दिवस उपाशी रायते, रात्री उशिरा घरी जाऊन आई जेवायला वाढेल तेव्हा जेवायचो. आता तर घरचा जेवणचा डबा रोड सेटवर येतो, आणि हल्ली मी कुठेही बाहेर जेवायचं टाळतोच, कितीही मोठं लग्न असेल , कितीही मोठ्या हॉटेलमध्ये असलं तरी मी काही जेवायला तिथे थांबत नाही, आणि buffet हा प्रकारच मुळात मला आवडत नाही.

पूर्वी मात्र लग्नाच्या पंगती असायच्या, आणि त्या पंक्तींमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची माणसं बघायला मिळायची, काही माझ्यासारखी लाजाळू माणसं वाढलं तर खायचं, नाही वाढलं तर आपलं आहे तेवढं खायचं आणि उठून जायचं, पण काही जण तर, वाढणाऱ्याला मोठमोठ्याने हाका मारून बोलून घेयचे, अरे मठ्ठा आण, अरे जारा बुंदी घेऊन ये, पापड आण, पूर्या घेऊन ये रे. खरंच काही माणसं अजिबात लाजत नाहीत. हे तर जेवणाचं झालं इतर गोष्टींच्या बाबतीत सुद्धा हे च लागू आहे .

अगदी सगळेच नाही किंवा उद्धट पणे नाही पण ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या बोलून दाखवल्या पाहिजे, आवश्यक असलेली वस्तू मागितली पाहिजे, आपल्या हक्काच्या गोष्टी आपण सांगितलं पाहिजेत , नाहीतर लोक त्यांच्या त्यांच्या आयुष्यात रमलेली असतात, तुमच्या मनातल्या गोष्टी ते समजून घेतीलच असं नाहीये. पुढारी कसे न लाजता मत मागतात, तसंच काहीसं.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.