
टीव्हीच्या डेली सोपच्या किंग म्हटल्या जाणाऱ्या एकता कपूर यांच्या लोकप्रिय सुपरनॅचरल ड्रामा नागीन या मालिकेचा नवा सिझन – 7 ची तयारी सुरु आहे. आता या मालिकेसाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरु आहे. आता नवीन नागीन कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या लोकप्रिय मालिकेतील नागीनची भूमिका करण्यासाठी प्रियंका चाहर चौधरी, रुबीना दिलैक आणि इशा मालवीय सारख्या अभिनेत्रींचे नाव शर्यतीत आहे. परंतू या शिवाय देखील टीव्ही मालिकेच्या जगातील अनेक अभिनेत्री या शर्यतीत असून नागीनची कॅरेक्टर करु शकतात. चला तर पाहूयात 5 अभिनेत्रींबद्दल विचार करुयात, कोण आहे एकता कपूर यांच्या पुढची नागीन पाहूयात…
‘मॅडम सर’ आणि ‘गुम है किसी के प्यार में’ सारख्या दोन सुपरहिट शोमधून चमकेली भाविका शर्मा यांना आणखी आव्हानात्मक भूमिका करायची आहे. आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांचे हृदय जिंकणारी भाविका नवीन नागीन बनू शकते.
अलिकडे येशा रूघानी हीचा शो ‘रब से दुआ’ ऑफ एअर झाला आहे. येशा या शोमध्ये धीरज कपूर सोबत काम करीत आहे. तिच्या शेवटच्या शोनंतर आता तिला आणखी चॅलेजिंग भूमिका करण्याची इच्छा आहे.तिच्या सर्व गुण असल्याने कलर चॅनलच्या यशस्वी नागीनमध्ये ती येऊ शकते असे म्हटले जात आहे.
टीव्ही मालिक ‘उडारियां’ आपल्या निरागस आणि दमदार अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधणारीर ट्वींकल अरोडा जर नागीन – 7 साठी कास्ट झाली तर नागीनच्या कॅरेक्टरमध्ये नाविन्य असू शकते.
अभिनेत्री शिवांगी जोशी चांगल्या अभिनयासोबत चांगली नृत्यांगणा देखील आहे.नागीन सिरियलमध्ये केवळ अभिनय नव्हे तर नृत्याचे अंग देखील गरजेचे आहे. यासाठी डान्स आणि एक्टींग परफेक्ट कॉम्बिनेशन असलेल्या शिवांगी जोशी हीचा देखील या मालिकेत परफेक्ट नागीन म्हणून निवड होण्यास ताकदीचे दावेदार होऊ शकते.
एमटीव्हीची प्रसिद्ध मालिका ‘कैसी ये यारियां’ से आपली अनोखी छाप सोडणारी अभिनेत्री नीती टेलर देखील चांगली ‘नागिन’ बनू शकते. तिची एक्टिंग स्किल्स आणि सौदर्य नागीनच्या कॅरेक्टरला एक वेगळी ओळख देऊ शकते.