Bigg Boss 16 | शालिन आणि टीनामध्ये जोरदार भांडणे, सुंबुलवर गंभीर आरोप

हा वाद भांडी धुण्यावरून सुरू होता. नेहमीप्रमाणे किचनमध्ये अर्चनाने देखील जोरदार हंगामा केला. हा वाद बटाट्यांमुळे झाला.

Bigg Boss 16 | शालिन आणि टीनामध्ये जोरदार भांडणे, सुंबुलवर गंभीर आरोप
| Updated on: Oct 20, 2022 | 10:53 AM

मुंबई : बिग बॉस 16 च्या (Bigg Boss 16) घरात काल जोरदार हंगामा बघायला मिळाला. निम्रत आणि प्रियंकामधील वादाने सकाळची सुरूवात झाली. हा वाद भांडी धुण्यावरून सुरू होता. नेहमीप्रमाणे किचनमध्ये (Kitchen) अर्चनाने देखील जोरदार हंगामा केला. हा वाद बटाट्यांमुळे झाला. शिव ठाकरेच्या हातात सध्या बिग बॉसच्या घराची सूत्रे आली आहेत. शिव ठाकरेने सर्वांना काम वाटून दिले आहे. राशनसाठी बिग बॉसने (Bigg Boss) घरातील सदस्यांना एक टास्क दिला.

बिग बॉसच्या घरात शालिन आणि टीनाची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. मात्र, या दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली आहेत. शालिन टीनाला म्हणतो की, तू माझे हृदय तोडले आहे. यावर टीना देखील तोच आरोप शालिनवर करते. एका टास्कमुळे शालिन आणि टीनाच्या नात्यामध्ये दुरावा आलाय.

शालिनसोबत झालेल्या भांडणानंतर टीना रडायला लागते. यादरम्यान सुंबुल देखील बेडरूममध्ये येते, परंतू सुंबुल आल्यावर दोघेही शांत बसतात. शालिन आणि टीनाच्या भांडनानंतर सुंबुल आनंदी दिसते. शालिन आणि गाैतममध्ये देखील जोरदार भांडणे होतात. निम्रतने देखील सुंबुलवर अनेक गंभीर आरोप केले.

गोरी अर्चनावर एवोकॅडो फेकल्याचा आरोप करते आणि त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू होतो. अन्न फेकण्यावरून गोरी आणि अर्चना भांडताना दिसतात. या भांडणामध्ये अर्चनाची बाजू प्रियंका घेते. कारण टास्कमध्ये अर्चनाने प्रियंका विजयी व्हावी, यासाठी खूप मेहनत घेतलेली असते.