
मुंबई : राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आदिल दुर्रानी आणि राखी सावंत (Rakhi Sawant) यांच्यामधील वाद थेट कोर्टात पोहचला आहे. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर अनेक गंभीर आरोप लावले. इतकेच नाही तर तिने दीड कोटी आदिल दुर्रानी याने घेतल्याचे म्हटले आहे. राखी सावंत दररोज धक्कादायक खुलासे करताना दिसत आहे. मराठी बिग बाॅसमधून राखी सावंत हिने बाहेर पडत सर्वांनाच मोठा धक्का देत थेट आदिल दुर्रानी याच्यासोबतच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर शेअर केले. विशेष म्हणजे राखी सावंत हिने हे फोटो शेअर करण्याच्या तब्बल सात महिने अगोदरच तिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. आदिल दुर्रानी याने लग्नाची गोष्ट सर्वांपासून एक वर्ष आपल्याला लपवण्यास सांगितल्याचा खुलासाही राखीने केला. राखी सावंत हिने लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारला आहे. इतकेच नाही तर तिने स्वत: चे नाव देखील बदलून फातिमा आदिल दुर्रानी असे ठेवले. या दरम्यानच आदिल दुर्रानी याने राखी सावंत हिच्यासोबतचे लग्न स्वीकारू शकत नाही आणि नाकारू शकत नसल्याचे म्हटले होते.
काही दिवसांनी परत एकदा राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित झाले. मात्र, राखी सावंत हिच्या आईचे निधन झाल्यानंतर लगेचच राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर गंभीर आरोप करत थेट म्हटले की, मला आदिल दुर्रानी हा धोका देत असून त्याचे बाहेर अफेअर सुरू आहे.
राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर घरेलू हिंसाचाराचा आरोपही केला. काही दिवसांपासून आदिल दुर्रानी या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. या दरम्यान राखीने गंभीर खुलासे देखील केले. हे सर्व प्रकरण सुरू असताना राखी सावंत ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसत आहे.
नुकताच राखी सावंत हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला. कारण या व्हिडीओमध्ये राखी सावंत ही नमाज अदा करताना दिसत आहे. हा राखी सावंत हिच्या बेडरूममधील व्हिडीओ आहे.
राखी सावंत हिचा नमाज अदा करतानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओबद्दल राखी सावंत हिने सांगितले की, आज सकाळी नमाजच्या वेळी आदिलला धार्मिक मार्गावर परतण्यासाठी प्रार्थना केली.