Sahkutumb Sahaparivar | अवनीला वाचवताना अंजीला ट्रकने उडवलं, शुद्धीवर आल्यावर पती म्हणून तिने दुसऱ्याचं नाव घेतलं!

छोट्यापडद्यावर गाजत असलेली स्टार प्रवाहची ‘सहकुटुंब सहपरिवार’ (Sahkutumb Sahaparivar) या मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत देखील अव्वल ठरली आहे. मालिकेतील कुटुंब आणि त्यांच्यातील एकोपा प्रेक्षकांना खूपच भावतो आहे.

Sahkutumb Sahaparivar | अवनीला वाचवताना अंजीला ट्रकने उडवलं, शुद्धीवर आल्यावर पती म्हणून तिने दुसऱ्याचं नाव घेतलं!
सहकुटुंब सहपरिवार

मुंबई : छोट्यापडद्यावर गाजत असलेली स्टार प्रवाहची ‘सहकुटुंब सहपरिवार’ (Sahkutumb Sahaparivar) या मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत देखील अव्वल ठरली आहे. मालिकेतील कुटुंब आणि त्यांच्यातील एकोपा प्रेक्षकांना खूपच भावतो आहे. आता या मालिकेतील सुखी कुटुंबाला नशिबाची नजर लागणार आहे. मालिकेत आता अंजली अर्थात अंजीचा अपघात होणार आहे.

मालिकेत अंजीचा अपघात इतकाच वळण येणार नाहीये, तर त्यात आणखी एक धक्कादायक ट्विस्ट देखील येणार आहे. अपघातानंतर अंजीला एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखम खोलवर असल्याने तिच्यावर तातडीचे उपचार सुरु असल्याचे नव्या प्रोमोत दाखवण्यात आले आहे.

पाहा नवा प्रोमो :

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

या प्रोमोत आपण पाहू शकतो की, हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असताना अंजलीला शुद्ध येते. मात्र, तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला विस्मृती झाल्याची शंका डॉक्टरांना येते. याची पुष्टी करण्यासाठी ते अंजलीला तिचे नाव विचारतात. यावर शुद्धीत आलेली अंजी स्वतःच नाव अंजली वैभव मोरे असं सांगते. हे ऐकून तिथे उपस्थित सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो.

कोण आहे वैभव मोरे?

‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेमध्ये अंजली ही पश्याची पत्नी दाखवली आहे. असं असताना देखील तिने शुद्धीत आल्यावर वैभवच नाव घेतलं आहे. वैभव मोरे हा पश्याचा भाऊ असून, मोरे कुटुंबाचाच एक भाग आहे. या सगळ्यात आता अंजलीची स्मृती गेल्याने पश्यावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अंजलीने का घेतलं वैभवचं नाव?

अपघातातून अंजली बचावली आहे. मात्र, शुद्धीत आल्यानंतर तिची स्मृती काही काळापर्यंत गेल्याचे डॉक्टर आणि मोरे कुटुंबाला कळले आहे. आता अंजलीने पश्याचं नाव न घेता वैभवचं नाव का घेतलं?, असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तर, मालिकेत सुरुवातीच्या कथानकात सरू वहिनीची बहिण अर्थात अंजलीचे लग्न हे मोरे कुटुंबातील धाकटे चिरंजीव वैभव मोरे याच्यासोबत जुळवण्यात आल्याचे दाखवले होते. मात्र, अचानक काही घडामोडींमुळे हे लग्न मोडते आणि अंजीला वैभवचा भाऊ पश्यासोबत लग्न करावे लागते.

अर्थात ज्या दिवशी अंजलीचे वैभवशी लग्न जुळले त्याच दिवसावर अंजलीची स्मृती अडकली आहे. त्यानंतर तिचं मोडलेलं लग्न, वैभवचं अवनीशी लग्न, पश्या सोबतचा नुकताच फुलत असलेला तिचा संसार या सगळ्या गोष्टींचा तिला विसर पडला आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे नेमकं काय घडणार याची उत्सुकत प्रेक्षकांना देखील लागली आहे.

हेही वाचा :

अण्णा नाईक लेकालाच बनवू पाहतायत नवं ‘झाड’, त्यांच्या तावडीतून वाचू शकेल का अभिराम?

‘देवमाणूस’ मालिकेच्या सक्सेस पार्टीत कलाकारांची धमाल, पाहा खास क्षण

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI