Sonali Bendre: ‘डान्स महाराष्ट्र डान्स’मध्ये सोनाली बेंद्रेची एण्ट्री; चेटकिणीसोबत घातला पिंगा

नुकताच 'डान्स महाराष्ट्र डान्स' या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या प्रोमोमध्ये सोनाली चेटकिणीसोबत पिंगा घालताना, धमाल करताना दिसत आहे. सोनाली आणि चेटकीण आपल्या डान्सच्या जुगलबंदीने धमाल उडवताना दिसत आहे.

Sonali Bendre: डान्स महाराष्ट्र डान्समध्ये सोनाली बेंद्रेची एण्ट्री; चेटकिणीसोबत घातला पिंगा
Sonali Bendre: 'डान्स महाराष्ट्र डान्स'मध्ये सोनाली बेंद्रेची एण्ट्री
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 11, 2022 | 4:58 PM

डान्स महाराष्ट्र डान्स (Dance Maharashtra Dance) या झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील रिॲलिटी शोने अवघ्या काही दिवसांतच लोकप्रियता मिळवली आहे. या कार्यक्रमात छोट्या डान्सर्सनी सर्वच चाहत्यांना त्यांच्या डान्सने वेड लावलं आहे. आता येत्या भागात सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) हिची धमाकेदार एण्ट्री होणार आहे. नुकताच ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या प्रोमोमध्ये सोनाली चेटकिणीसोबत पिंगा घालताना, धमाल करताना दिसत आहे. सोनाली आणि चेटकीण आपल्या डान्सच्या जुगलबंदीने धमाल उडवताना दिसत आहे. डान्स महाराष्ट्र डान्स हा शो दर बुधवारी आणि गुरुवारी रात्री 9.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो.

सोनाली कुलकर्णी आणि गश्मीर महाजनी हे दोघे या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत असून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता संदीप पाठक करत आहे. डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम झी मराठी वाहिनीवर 27 जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीस आला.

या कार्यक्रमातील आपल्या परीक्षकाच्या भूमिकेबद्दल बोलताना सोनाली म्हणाली, “डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाच्या परीक्षकाची भूमिका निभावण्याची जबाबदारी मला मिळाली आहे याचा मला आनंद आहे. झी मराठी आणि डान्स रिऍलिटी शो सोबत माझं नातं खूप आधीपासून आहे त्यामुळे पुन्हा एकदा एक डान्स रिॲलिटी शो तो पण झी मराठीवर करताना मला खूप आनंद होतोय. आताची पिढी ही खूपच जास्त टॅलेंटेड अहे. त्यामुळे त्यांचं परीक्षण करणं हे आम्हाला सोपं जाईल असं मला अजिबात वाटत नाही.”