टास्क पूर्ण करताना दमछाक; अंकिता आणि सूरजचा व्हीडिओ पाहून पोट धरून हसाल

Suraj Chavan and Ankita Prabhu Walawalkar Video : सूरज चव्हाण आणि अंकिता वालावालकर या दोघांचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील टास्क दरम्यानचा व्हीडिओ सध्या चर्चेत आहे. पाणगेंडा ओळखताना सूरजची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय झालं? पाहा व्हीडिओ...

टास्क पूर्ण करताना दमछाक; अंकिता आणि सूरजचा व्हीडिओ पाहून पोट धरून हसाल
सूरज चव्हाण आणि अंकिता वालावलकर
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 19, 2024 | 1:34 PM

‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा सिझन चांगलाच गाजतो आहे. यंदाच्या सिझनमधील स्पर्धकांची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या सिझनमध्ये चर्चेत असलेला एक स्पर्धक म्हणजे रीलस्टार सूरज चव्हाण… सूरज चव्हाणचा साधेपणा, त्याचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील वावर प्रेक्षकांना आवडतो आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील टास्कमध्ये सूरज चव्हाण त्याचा वेगळेपणा सिद्ध करत असतो. आता नुकतंच पार पडलेल्या टास्कमध्ये अंकिता आणि सूरज या जोडीने कमाल केली. त्यांचा टास्क दरम्यानचा व्हीडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

सूरज चव्हाणची दमछाक

‘बिग बॉस मराठी’चा आगामी भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अंकिता आणि सूरज टास्क खेळताना दिसत आहेत. अंकिता सूरजला पाणगेंड्याची अॅक्टिंग करुन दाखवत आहे. तर सूरजला ती कोणत्या प्राण्याची अॅक्टिंग करतेय? हे ओळखायचं आहे. सूरजने गेंडा बरोबर ओळखला आहे. पण पाणगेंडा ओळखण्यात त्यांची झालेली पंचायत झालीय. हे पाहून प्रेक्षकांना मात्र हसू आवरत नाहीये. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये नावीन्य आहे. या आठवड्यात घरात जंगल राज असणार आहे. 50 दिवस उलटल्यानंतरही टास्कमध्ये सदस्य तेवढीच मजा करताना दिसत आहेत. त्यामुळे टास्क आणखी रंगतदार होणार आहे.

पोहतोय, नाचतोय… सूरज काय म्हणाला?

अंकिता पाणगेंड्याची अॅक्टिंग करत आहे. सूरज तिचे हातवारे ओळखत आहे. अंकिताचे हातवारे पाहून गेंडा असल्याचं सूरज म्हणाला. ते उत्तराच्या जवळपास जाणारं होतं. त्यामुळे अंकिताने आणखी हातवारे केले. त्यावर काही कळत नाही, असं सूरज म्हणतो… पोहतोय, नाचतोय असं सूरज म्हणतो. त्यावर सगळे हसातात. गेंडा ओळखलाय. पण पाण्यातला गेंडा मला माहिती नाही, असं सूरज म्हणतो. तेच उत्तर असल्याने एकच हशा पिकतो.

सूरजने पाणगेंडा ऐवजी फक्त गेंडा म्हटल्याने अभिजीत म्हणतोय,पूर्ण केलं नाही अजून…. त्यावर हताश सूरज उत्तर देतो. काहीच कळत नाही आहे. ओळखलाय पण पाण्यातला गेंडा माहिती नाही…., असं सूरज म्हणतो. बी बी करन्सी मिळवण्याचा हा टास्क मात्र खूपच मजेदार आहे. संपूर्ण घराने एकत्रित किती बी बी करन्सी कमावली हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.