‘मन उडु उडु झालं’ घेणार प्रेक्षकांचा निरोप; कलाकारांच्या रॅप अप पार्टीतील फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

'खूप मिस करू मन उडु उडु झालं या मालिकेला, तू लवकरच येशील खात्री आहे', असं एका युजरने लिहिलं. तर 'तुमच्या पुढील प्रोजेक्ट्ससाठी शुभेच्छा', असं दुसऱ्याने म्हटलं.

मन उडु उडु झालं घेणार प्रेक्षकांचा निरोप; कलाकारांच्या रॅप अप पार्टीतील फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
'मन उडु उडु झालं' घेणार प्रेक्षकांचा निरोप
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 18, 2022 | 7:19 PM

झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडु उडु झालं’ (Mann Udu Udu Jhala) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि अभिनेता अजिंक्य राऊत यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. मात्र आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजतंय. ही मालिका ऑफ एअर जाणार असून त्यापूर्वी मालिकेच्या टीमने ‘रॅप अप पार्टी’ केली. हृता दुर्गुळे, अजिंक्य राऊत आणि मालिकेतील इतर सहकलाकारांनी एकमेकांसोबत वेळ घालवला. मालिकेच्या सेटवर काम करताना या कलाकारांमध्ये ऑफस्क्रीन चांगली मैत्री जमली होती. हीच मैत्री सोशल मीडियावरील या फोटोंमध्ये पहायला मिळते. अजिंक्य राऊतने (Ajinkya Raut) रॅप अप पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

मन उडु उडू झालं मालिकेच्या टीमने नुकतंच शेवटच्या शेड्युलचं शूटिंग पूर्ण केलं. त्यानंतरच रॅप अप पार्टी करण्यात आली. या मालिकेचा क्लायमॅक्स एपिसोड लवकरच झी मराठीवर प्रसारित होईल. अजिंक्यने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. मालिका लवकर प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली.

पहा फोटो-

‘खूप मिस करू मन उडु उडु झालं या मालिकेला, तू लवकरच येशील खात्री आहे’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘तुमच्या पुढील प्रोजेक्ट्ससाठी शुभेच्छा’, असं दुसऱ्याने म्हटलं. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप का घेतेय यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र मालिकेतील कलाकारांचे इतर कमिटमेंट्स आणि आगामी प्रोजेक्ट्समुळे निर्मात्यांनी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. मालिकेच्या क्लायमॅक्स एपिसोडमध्ये प्रेक्षकांना इंद्रा आणि दीपूचं लग्न पहायला मिळणार आहे.