AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Man Udu Udu Zhala: दिपूला मिळवण्यासाठी इंद्रा देणार अग्निपरीक्षा!

रविवारी प्रसारित होणाऱ्या एक तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक पाहू शकतील की दिपूची प्रकृती खूप खालावणार आहे. डॉक्टर देशपांडे कुटुंबियांना दिपूला काहीही होऊ शकतं असं म्हणतात.

Man Udu Udu Zhala: दिपूला मिळवण्यासाठी इंद्रा देणार अग्निपरीक्षा!
Man Udu Udu ZhalaImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Jun 03, 2022 | 2:52 PM
Share

झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Zhala) या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. इंद्रा (Ajinkya Raut) आणि दिपूची (Hruta Durgule) जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. सध्या प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की दिपू अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. तिच्या प्रकृतीमध्ये काही सुधार नाही झाला आहे. तिच्या या अवस्थेमुळे देशपांडे कुटुंबीय आणि इंद्रा खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत. रविवारी प्रसारित होणाऱ्या एक तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षक पाहू शकतील की दिपूची प्रकृती खूप खालावणार आहे. डॉक्टर देशपांडे कुटुंबियांना दिपूला काहीही होऊ शकतं असं म्हणतात. हे ऐकून इंद्राच्या पायाखालची जमीन सरकते आणि दिपूला सुखरूप परत मिळवण्यासाठी इंद्रा अग्निपरीक्षा द्यायचं ठरवतो.

या अग्निपरीक्षेत  त्याच्या मार्गात खूप अडथळे येतात. इंद्रा अडथळ्यांवर मात करू शकेल, इंद्राच्या अग्निपरीक्षेमुळे दिपूचे प्राण वाचणार का, हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. 5 जून रविवार 7 वाजता झी मराठी वाहिनीवर हा एपिसोड पहायला मिळेल. यामध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांच्या मुख्य भूमिका आहेत.

पहा मालिकेचा प्रोमो-

हृता मालिका सोडणार नाही

मालिकेच्या निर्मात्यांशी हृताचे काही वाद झाले आणि त्यामुळेच ती मालिका सोडणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र खुद्द हृताने या चर्चांवर उत्तर दिलं आहे. ही मालिका सोडणार नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. “मी जेव्हापासून मालिकेत काम करायला सुरुवात केली, तेव्हापासूनच या चर्चांना उधाण आलंय आणि यामागचं कारण मला अजूनपर्यंत कळालेलं नाही. पण असं काहीच नाहीये. मी माझ्या लग्नासाठी अधिकृतरित्या रजा घेतली होती”, असं ती म्हणाली. हृताने नुकतीच दिग्दर्शक प्रतीक शाहशी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या 15 दिवसांच्या सुट्ट्यांनंतर तिने पुन्हा शूटिंगला सुरुवात केली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.