Praveen Kumar Sobti | महाभारतात ‘भीम’ साकारणाऱ्या प्रवीण सोबतींची आर्थिक परिस्थिती बिकट, सरकारकडे केली मदतीची याचना!

Praveen Kumar Sobti | महाभारतात ‘भीम’ साकारणाऱ्या प्रवीण सोबतींची आर्थिक परिस्थिती बिकट, सरकारकडे केली मदतीची याचना!
Praveen Kumar Sobti (Image Credit : Twitter)

30 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारित झालेली 'महाभारत' ही मालिका खूप गाजली होती. मालिका पाहण्यासाठी घरोघरी गर्दी व्हायची. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्येही या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. मात्र, आज महाभारत चर्चेत असण्याचं कारण वेगळं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 26, 2021 | 5:56 PM

मुंबई : 30 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारित झालेली ‘महाभारत’ ही मालिका खूप गाजली होती. मालिका पाहण्यासाठी घरोघरी गर्दी व्हायची. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्येही या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. मात्र, आज महाभारत चर्चेत असण्याचं कारण वेगळं आहे. ‘महाभारत’ आठवले की, पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे ‘गदाधारी भीम’ची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti). प्रवीण यांनी आपल्या सशक्त व्यक्तिरेखेने केवळ अभिनयाचे जगच गाजवले नाही, तर क्रीडा क्षेत्रातही यश मिळवले. पण, आता या अभिनेत्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. अडचणीत जगणाऱ्या प्रवीणने पेन्शनचे आवाहन केले आहे.

पंजाबमध्ये सरकार स्थापन करणाऱ्या सर्व पक्षांबाबत माझी तक्रार आहे, असे अभिनेत्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आशियाई खेळ खेळणाऱ्या किंवा पदक जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंना पेन्शन दिली जाते. मात्र, त्यांना हा लाभ मिळाला नाही. प्रवीण हे सर्वाधिक सुवर्णपदक जिंकणारे खेळाडू आहेत. राष्ट्रकुलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव खेळाडू होते.

प्रवीणची क्रीडा कारकीर्द

प्रवीण कुमार सोबती यांचा जन्म 6 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसरच्या सरहाली गावात झाला. एका मुलाखतीत प्रवीण यांनी सांगितले होते की, लहानपणापासूनच आईच्या हातचे दूध, दही आणि देशी तूप खाल्ल्याने माझे शरीर खूप जड झाले होते. माझे शरीर पाहून शाळेतील सर्वजण थक्क झाले. माझ्या शरीराकडे पाहून मुख्याध्यापकांनी मला खेळांमध्ये घ्यायला सुरुवात केली. हळूहळू मी प्रत्येक स्पर्धा जिंकू लागलो. असे करताना 1966 मध्ये त्यांना राष्ट्रकुल खेळ खेळण्याची संधी मिळाली. किंग्स्टन, जमैका येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये मी डिस्कस थ्रोमध्ये रौप्य पदक जिंकले. 1966 आणि 1970 मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून मी परतलो. करिअर उत्तम चालले होते, मग अचानक त्यांना पाठदुखीची तक्रार आली.

अभिनय कारकिर्दीची सुरुवात

त्यांची खेळातील कामगिरी आणि शरीरयष्टी पाहून त्यांना बीएसएफमध्ये डेप्युटी कमांडंट म्हणून नोकरीही मिळाली. आशियाई खेळ आणि ऑलिम्पिकमधून त्यांचे असे नाव झाले होते की, 1986 मध्ये त्यांना एक दिवशी मेसेज आला की, बीआर चोप्रा महाभारत बनवत आहेत आणि त्यांना भीमाच्या भूमिकेसाठी प्रवीण यांना भेटायचे आहे. यापूर्वी त्यांनी कधीही अभिनयात नशीब आजमावले नाही. मात्र, या व्यक्तिरेखेबद्दल समजल्यानंतर ते त्यांना भेटायला गेले. त्यांना पाहताच चोप्रा म्हणाले, भीम सापडला आहे. येथूनच त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. 50 हून अधिक चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी चाचा चौधरी या लोकप्रिय टीव्ही मालिकेत साबूची भूमिका साकारली होती.

प्रवीण कुमार आता काय करतात?

प्रवीण कुमार सांगतात की, वयाच्या 76व्या वर्षी मी उदरनिर्वाहासाठी पैसे कसे कमवता येतील याचा विचार करत आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी बराच काळ घरीच आहे. मणक्याच्या समस्येमुळे मी कोणतेही काम करू शकत नाही. एक काळ असा होता की, सर्वजण ‘भीम’ला ओळखत होते आणि एक काळ असा आहे की, सगळेच परके झाले आहेत.

हेही वाचा :

Salman Khan : सापाला पाहून सलमानला फुटला घाम! मदत करा म्हणून फोनवर जोरजोरात ओरडला; वाचा मध्यरात्री काय घडलं?

Bigg Boss Marathi 3 Contestants : कोण होणार बिग बॉस मराठी सीझन 3चा विजेता? एलिमिनेट झालेली मीरा म्हणाली होती…

Sushmita Sen : रोहमन शॉलसोबतच्या ब्रेक-अपनंतर सुष्मिता सेननं शेअर केली पोस्ट; म्हणाली, खुश राहण्यासाठी…


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें