Bigg Boss 16 | बिग बाॅसच्या घरात होणार धमाका ‘ही’ अभिनेत्री घेणार वाईल्ड कार्ड एन्ट्री

विशेष म्हणजे बिग बाॅसने अर्चनाला शिवचा गळा पकडल्याने बाहेरचा रस्ता दाखवला.

Bigg Boss 16 | बिग बाॅसच्या घरात होणार धमाका ही अभिनेत्री घेणार वाईल्ड कार्ड एन्ट्री
| Updated on: Nov 15, 2022 | 10:48 PM

मुंबई : बिग बॉस 16 सध्या चांगलेच रंगात आले असून बिग बाॅसच्या घरात जोरदार हंगामा होताना दिसत आहे. शिव ठाकरे आणि अर्चना गाैतममध्ये झालेला वाद तर सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरला. बिग बाॅसच्या इतिहासामध्ये असे पहिल्यांदा घडले की, स्पर्धकाने भांडणामध्ये दुसऱ्या स्पर्धेकांचा गळा पकडला. विशेष म्हणजे बिग बाॅसने अर्चनाला शिवचा गळा पकडल्याने बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र, हे फक्त शिव ठाकरेच्या चाहत्यांना शांत करण्यासाठी बिग बाॅसचा गेम असल्याचे कळाले. दोनच दिवसांनी परत सलमान खान याने अर्चनाला बिग बाॅसच्या घरात घेतले.

इतर सीजनपेक्षा बिग बाॅस 16 एकदम जबरदस्त सुरू आहे. बिग बाॅसच्या घरात म्हणावे तेवढे टाॅस्क अजून दिले जात नाहीयेत. तरीही वाद आणि प्रेक्षकांचे मनोरंजन सुरू आहे. नुकताच बिग बाॅसच्या घराच्या बाहेर पडलेली स्पर्धेक अर्थात गोरी हिने बाहेर पडल्यानंतर मोठे विधान करत म्हटले आहे की, सुंबुल आणि अंकित बिग बाॅसच्या घरात काहीच करत नसूनही त्यांना अजूनही घरात ठेवले आहे. त्यांच्यापेक्षा माझा गेम चांगला होता.

आता बिग बाॅसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या सीजनची पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री नेमकी कोण हे जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सर्वांची आवडती रिद्धिमा पंडित आहे. आता रिद्धिमा बिग बाॅसच्या घरात येऊन काय धमाका करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सोशल मीडियावर रिद्धिमाचे जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे.