Prakash Raj | अखेर प्रकाश राज यांनी मन मोकळे करत सांगितले इंडस्ट्रीमधील सत्य
प्रकाश राज कायमच आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता प्रकाश राज यांनी मोठे विधान केले आहे.

मुंबई : कायमच खलनायकची भूमिका साकारणारा प्रसिध्द अभिनेता अर्थात प्रकाश राज नेहमीच चर्चेत असतात. सिंघम चित्रपटातील जयकांत शिकरे म्हटले की, संपूर्ण चित्रपटच आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. प्रकाश राज कायमच आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. इतकेच नाही तर प्रकाश राज राजकीय मुद्दावर देखील बोलण्यासही कधीच मागे पुढे पाहात नाहीत. मात्र, राजकिय मुद्दावर जग जाहीरपणे मत मांडणे प्रकाश राज यांना महागात पडत असल्याचे स्वत: प्रकाश राज यांनी सांगितले आहे.
प्रकाश राज बोलताना म्हणाले की, राजकीय विचारांमुळे काही लोक माझ्यासोबत काम करू इच्छित नाहीत. यामुळेच मला चित्रपटात काम मिळत नाहीये. प्रकाश राज यांनी मुलाखतीमध्ये म्हटले की, माझ्या राजकीय प्रवासामुळे मी एक वेगळी ओळख निर्माण केलीये. इंडस्ट्रीत असे काही लोक आहेत, ज्यांना आता माझ्यासोबत काम करायचे नाही. विशेष म्हणजे त्या लोकांना अजून कोणी थांबवले देखील नाहीये.
पुढे प्रकाश राज म्हणाले की, काही लोकांना याची भीती वाटते आणि त्यामुळेच ते माझ्यासोबत काम करू इच्छित नाहीत. मुळात म्हणजे नक्कीच मला या सर्व गोष्टींचा काहीच परिणाम पडत नाही. मी इतका जास्त ताकदवर आहे की, हे सर्वकाही मी सहन करू शकतो. फक्त मला एकच गोष्ट कायम वाटते की, माझी कमजोरी कधीच इतरांची ताकद बनू नये. प्रकाश राज यांच्या या विधानाची आता सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
