Uorfi Javed | उर्फी जावेद आणि ‘साक्षी द्विवेदी’मध्ये मोठा वाद सुरू, वाचा नेमके काय घडले?
उर्फी तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. बऱ्याच वेळा उर्फीच्या कपड्यांवरून तिला टीकेला सामोरे जावे लागते.

मुंबई : उर्फी जावेद हिने अत्यंत कमी वेळामध्ये एक वेगळी ओळख नक्कीच निर्माण केलीये. ओटीटी बिग बाॅसमध्ये उर्फी सहभागी झाली होती, तेंव्हापासूनच ती चर्चेत आहे. उर्फी तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. बऱ्याच वेळा उर्फीच्या कपड्यांवरून तिला टीकेला सामोरे जावे लागते. मात्र, कोणाचाही विरोध किंवा टीका यावर लक्ष न देता तिला जे योग्य वाटते तेच उर्फी करते. बऱ्याच वेळा उर्फी आपल्यावर होणाऱ्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर देखील देते. उर्फी हटके स्टाईलचे फोटो आणि व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर शेअर करते.
View this post on Instagram
आता उर्फी जावेद एमटीवी स्प्लिट्सव्हि एक्स 4 मध्ये सहभागी होत आहे. उर्फी जावेदची स्प्लिट्सव्हिलामध्ये एन्ट्री झाल्यानंतर लगेचच त्याच शोमधील स्पर्धक साक्षी द्विवेदीसोबत वाद झाले आहेत. साक्षी हिने उर्फीच्या स्टाईलवर कमेंट करत तिच्यावर टिका केलीये. ज्यावर उर्फीने जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. उर्फीच्या टीकेवर आता साक्षी द्विवेदी काय प्रतिउत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
उर्फीने म्हटले आहे की, जा तुझे तोंड बघ…तु जर परत एकदा माझ्या वैयक्तिक आयुष्यावर जर भाष्य केले तर चांगले होणार नाही, तुला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. मुळात म्हणजे उर्फी आणि वाद हे समीकरण फार पूर्वीपासून सुरू आहे. टीव्ही आणि बाॅलिवूड क्षेत्राशी संबंध अनेकजण उर्फी जावेदवर टीका करतात. उर्फी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिच्यावर केल्या जाणाऱ्या प्रत्येक टीकेला उत्तर देते.
