Tunisha Sharma Death | ‘प्यार सबसे ऊपर’ तुनिशा शर्मा हिच्या हातावर टॅटू, व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुनिषा शर्मा हिने हातावर एक टॅटू काढल्याचे दिसत आहे आणि हाच व्हिडीओ व्हायरल होतोय.

Tunisha Sharma Death | प्यार सबसे ऊपर तुनिशा शर्मा हिच्या हातावर टॅटू, व्हिडीओ होतोय व्हायरल
| Updated on: Dec 25, 2022 | 6:34 PM

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. अजूनही तुनिषा शर्माच्या चाहत्यांना तुनिषाने आत्महत्या केलीये यावर विश्वास नाहीये. चाहते सतत तिच्या फोटोंवर कमेंट करताना दिसत आहेत. तुनिषा शर्मा ही टीव्ही अभिनेता शीजान खान याच्यासोबत रिलेशनमध्ये होती. दोघेही एकाच मालिकेमध्ये काम करत होते. काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत खटके उडत असल्यामुळे यांचे 15 दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले होते. ब्रेकअप झाल्यामुळे तुनिषा शर्मा ही तणावामध्ये असल्याचे FIR मध्ये म्हणण्यात आले आहे.

सोशल मीडियावर सध्या तुनिषा शर्मा हिचा एक जुना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुनिषा शर्मा हिने हातावर एक टॅटू काढल्याचे दिसत आहे आणि हाच व्हिडीओ व्हायरल होतोय.

तुनिषा शर्मा हिने काढलेल्या टॅटूमध्ये लिहिले आहे की, प्यार सबसे ऊपर….म्हणजेच प्रेम सर्वात वरती…हा व्हिडीओ गोंदत असताना तुनिषा शर्मा ही खूप जास्त आनंदी दिसत आहे. तिने याचे अनेक फोटोही शेअर केले होते.

शेवटी तुनिषा शर्मा हिला प्रेमामुळेच आत्महत्या करण्यासाठी मोठे पाऊल उचलावे लागले आहे. यामुळेच तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आत्महत्येच्या फक्त सहा तास अगोदर तुनिषा शर्मा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येप्रकरणात आता शीजान खान याच्यावर मोठे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी शीजानला अटकही केली आहे. आता FIR काॅपी देखील पुढे आलीये.