Urmila Kothare: अवघ्या काही दिवसांतच ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून उर्मिला कोठारेची एग्झिट?

अवघ्या काही दिवसांतच उर्मिला ही मालिका सोडणार असल्याने चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केला आहे. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Urmila Kothare: अवघ्या काही दिवसांतच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून उर्मिला कोठारेची एग्झिट?
Urmila Kothare
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 02, 2022 | 9:18 AM

तब्बल 12 वर्षांनंतर अभिनेत्री उर्मिला कोठारेने (Urmila Kothare) ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Me Geet Gaat Aahe) या मालिकेतून पुनरागमन केलं. आता उर्मिला ही मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. ज्यामध्ये उर्मिला साकारत असलेल्या ‘वैदेही’चा मृत्यू दाखवण्यात येतो. उर्मिलाच्या एग्झिटबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसून प्रोमो पाहिल्यानंतर मालिकेतील तिची भूमिका संपुष्टात आल्याचं समजतंय. अवघ्या काही दिवसांतच उर्मिला ही मालिका सोडणार असल्याने चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केला आहे. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात उर्मिला वैदेही हे पात्र साकारत असून ती स्वराच्या आईच्या भूमिकेत आहे. (Marathi Serial)

या शोची घोषणा झाल्यापासून उर्मिला चर्चेत आहे. उर्मिलाने आजवर पती आदिनाथ कोठारे आणि सासरे महेश कोठारे यांच्या कोठारे प्रॉडक्शन्स अंतर्गतच काम केलं होतं. आता ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या निमित्ताने तिने दुसऱ्या प्रॉडक्शन अंतर्गत काम करण्याचं स्वीकारलं होतं. याच मालिकेदरम्यान उर्मिला आणि आदिनाथ यांच्यात काहीतरी बिनसल्याचीही चर्चा झाली. आता ती मालिका सोडणार असल्याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पहा प्रोमो-

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि प्रिया मराठे यांच्याही भूमिका आहेत. या मालिकेसाठी रिअल लोकेशनचा वापर करण्यात येतोय. या मालिकेचं कथानक नागपूरमधील एका गावात घडतं. त्यामुळे शूटसाठी खऱ्या गावाची निवड करण्यात आली आहे. मालिकेत दिसणारी घरं, आजूबाजूचा परिसर आणि विशेष म्हणजे गावकरी हे सगळं खरंखुरं असून वास्तवादी चित्रण करण्यासाठी संपूर्ण टीम मेहनत घेत आहे.