
मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या तब्बल 15 वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तारक मेहता मालिकेमध्ये भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची जोरदार फॅन फाॅलोइंग (Fan following) ही सोशल मीडियावर बघायला मिळते. तारक मेहता मालिका ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती आहे. काही दिवसांपूर्वी तारक मेहता मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री तिने शोचे निर्माता असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप (Serious charges) केले. गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर शोमधील अनेक कलाकार गंभीर आरोप करताना दिसत आहेत.
तारक मेहता मालिकेत जेठालालच्या वडिलांची भूमिका साकारणारा अभिनेता अमित भट्ट हा नेहमीच चर्चेत असतो. विशेष म्हणजे अमित भट्ट याची जोरदार फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे अमित भट्ट हा मालिकेच्या सुरूवातीपासूनच मालिकेसोबत सोडलेला आहे. विशेष म्हणजे अमित भट्ट हा मालिकेमध्ये जबरदस्त अशी भूमिका करताना दिसतो.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अमित भट्ट याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओनंतर अमित भट्ट याला टार्गेट करण्यास सुरूवात केलीये. इतकेच नाही तर अनेकांनी थेट अमित भट्ट याला खडेबोल सुनावले आहेत. अमित भट्ट याचा हा व्हिडीओ पाहून चाहते संतापले आहेत.
अमित भट्टच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तो गुटखा खाताना दिसत आहे. यानंतर या व्हिडीओवर कमेंट करत एका चाहत्याने लिहिले की, तू गुटखा खात आहेस का? यावर अमित भट्ट याने होकार दिला. त्यानंतर अमित भट्टला सोशल मीडियावर तूफान ट्रोल केले जात आहे. अनेकांनी गुटखा खाणे आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे सांगितले.
इतकेच नाही तर दातांच्या डाॅक्टरकडे जाऊन दात साफ करण्याचा सल्ला देखील अनेकांनी अमित भट्टला दिलाय. आपल्या आरोग्यासाठी गुटखा खाणे किती जास्त धोकादायक आहे हे सांगताना चाहते मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. मात्र, आता सोशल मीडियावर अमित भट्टचा तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.