AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan House Firing : आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचं वेषांतर, गुजरातच्या मंदिरात भाविक बनून गेले अन्…

Salman Khan : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर मोठे खुलासे होताना दिसत आहेत. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हेच नाही तर वीस पथके तयार करण्यात आली. गोळीबार करणारे हे हल्लेखोर मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांपासून राहत होते.

Salman Khan House Firing : आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचं वेषांतर, गुजरातच्या मंदिरात भाविक बनून गेले अन्...
salman khan
| Updated on: Apr 17, 2024 | 12:52 PM
Share

अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबाराची घटना रविवारी पहाटे घडली. या घटनेनंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर हल्लेखोरांना पकडण्यासाठी तब्बल 20 पथके पोलिसांची तयार करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात कसून चाैकशी करण्यास सुरूवात केली. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांकडून हे स्पष्ट करण्यात आले की, आरोपी हे मुंबईतील नसून इतर राज्यातील आहेत. या गोळीबार प्रकरणातील काही सीसीटीव्ही फुटेज देखील पुढे आले. एका फुटेजमध्ये तर हल्लेखोरांचा चेहरा स्पष्ट दिसत होता. या हल्लेखोरांना पकडणे पोलिसांसमोर मोठे आवाहन नक्कीच होते.

गोळीबाराच्या घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी मोठी शक्कल लढवली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिस मंदिरात भाविक म्हणून गेले. आरोपींना पळून जाण्याची एकही संधी मिळू नये, याकरिता गुन्हे शाखेचे अधिकारी थेट भाविक बनले.

हल्लेखोर भुजच्या माता नु मढ मंदिरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी भाविकांच्या वेशात मंदिरात प्रवेश केला. यावेळी हल्लेखोर विक्की गुप्ता आणि सागर पाल बेसावधपणे मंदिराच्या कोपऱ्यात झोपले होते. यावेळी पोलिसांनी या दोन्ही हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. हल्लेखोरांना काही कळण्याच्या आतच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे दोन्ही हल्लेखोर आता मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून 10 दिवसांची पोलिस कोठडी त्यांना सुनावण्यात आलीये. आता पोलिस हल्लेखोरांकडून कसून चाैकशी करणार आहेत. हल्लेखोर या प्रकरणात काही मोठे खुलासे करू शकतात. हे दोन्ही हल्लेखोर बिहारमधील रहिवाशी असून काही महिन्यांपूर्वीच मुंबईत दाखल झाले होते आणि पनवेलमध्ये त्यांनी फ्लॅट खरेदी केला होता.

सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याच्या अगोदर यांनी घराची रेकी देखील केल्याची माहिती उघड होत आहे. काही महिन्यांपासून या गोळीबाराचे प्लनिंग सुरू होते. हेच नाही तर मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई याची देखील चाैकशी केली जाऊ शकते. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई याच्याच भावाने घेतलीये. लॉरेन्स बिश्नोई हा सलमान खान याला काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत